न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्सला काही दिवसांपूर्वी हृदयाची मुख्य धमनी फुटल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची स्थिती खूप गंभीर आहे. त्यांना तात्काळ स्वरूपात ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांना आता सिडनीच्या रुगणालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, केर्न्सच्या मदतीसाठी न्यूझीलंडचा पूर्व कर्णधार ब्रेंडन मॅक्कलम समोर आला आहे. विशेष म्हणजे केर्न्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले होते, तेव्हा या पूर्ण प्रकरणात मॅकलम केर्न्सच्या विरोधात बोलत होता.
मॅक्कलमने केर्न्ससाठी मदतीचा हात पुढे केल्यानंतर एका रेडिओ कार्यक्रमादरम्यान तो म्हणाला, “आता केर्न्स आणि माझ्यातील संबंध महत्त्वाचे नाहीत. सध्या सर्व लोकांनी केर्न्स आणि त्यांच्या परिवाराला मदत करण्याची वेळ आहे. खरेतर बोलण्यासाठी हा विषय खूप कठीण आहे. आम्ही खूप काळापासून एकमेकांना पाहिलेले नाही. आमच्या संबंधांमध्ये तसे पाहायला गेले तर जास्त काहीही नाही. परंतु केर्न्स हा न्यूझीलंडचे माजी खेळाडू लांस केर्न्स यांचा मुलगा आहे. तसेच तो देखील एक पिता आहे. त्यांच्या जीवनात यापूर्वीही असे अपघात घडलेले आहेत. ज्यामुळे केर्न्सने याआधीच त्याच्या बहिणीला देखील गमावले आहे.”
Wishing #ChrisCairns a very speedy recovery. pic.twitter.com/JBLHA2n25g
— VVS Laxman (@VVSLaxman281) August 10, 2021
“त्यामुळे सध्याचा काळ केर्न्स यांच्यासाठी व त्यांच्या परिवारासाठी खूप कठीण काळ आहे. त्याचबरोबर केर्न्सच्या चाहत्यांसाठी देखील हा खूप कठीण काळ आहे. मी आणि माझ्या परिवारातील सदस्य आम्ही त्या लोकांविषयी विचार करत आहोत जे पीडित आहे,” असेही मॅक्कलम म्हणाला.
दरम्यान, केर्न्स हे न्यूझीलंड संघाचे त्यांच्या काळातील एक महान अष्टपैलू खेळाडू होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत न्यूझीलंड संघाकडून खेळताना एकूण ६२ कसोटी सामने खेळले आहेत. त्याचबरोबर २१५ एकदिवसीय सामने आणि दोन टी-२० सामने सुद्धा खेळले आहेत. ज्यात कसोटीमध्ये ३३२० धावांसह २१८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यांमध्ये २९.४६ च्या सरासरीने ४९५० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर २०१ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-कारकिर्दीतील १२ वर्षे झोपेशी लढत राहिला ‘मास्टर ब्लास्टर’, पाहा शेवटी कसा मिळवला तोडगा?
-‘नातं पक्कचं समजायच म्हणजे’! राहुलच्या शतकाने सुनिल शेट्टी इंप्रेस, अशी प्रतिक्रिया देत वेधले लक्ष
-चेन्नईमागून मुंबईची बाजी, धोनीच्या संघाला ‘या’ गोष्टीसाठी युएई सरकारकडून नकार; वाढल्या अडचणी