झिम्बाब्वे क्रिकेटच्या इतिहासातील एका मोठ्या खेळाडूने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन टेलर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हा निर्णय अचानक आणि यापूर्वी कसलीही कल्पना न देला घेतला आहे. तो सोमवारी (१३ सप्टेंबरला) आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे आणि हा सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला अखेरचा सामना ठरणार आहे.
ब्रेंडनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक पोस्ट शेअर केली आहे आणि सर्वांना त्याच्या निवृत्तीची माहिती देत आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये आज (१३ सप्टेंबरला) आयर्लंडविरुद्ध खेळला जाणारा सामना हा त्याचा देशासाठीचा शेवटचा सामना असेल असे म्हटले आहे. त्याने पोस्टमध्ये त्याचे कुटुंबीय आणि झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत.
आयर्लंड दौऱ्यानंतर झिम्बाब्वे संघ स्काॅटलँड संघाविरुद्ध टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, ब्रेंडनने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर तो आता या मालिकेत सहभाग घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
https://twitter.com/BrendanTaylor86/status/1437132403760320521?s=20
ब्रेंडनने यापूर्वीही एकदा आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे घोषित केले होते. त्याने २०१५ मध्ये आर्थिक कारणांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत काउंटी क्रिकेटमध्ये नाॅटिंघमशायर संघासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. मात्र, २०१७ मध्ये त्याने ही निवृत्ती मागे घेत पुन्हा झिम्बाब्वे संघासाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता.
झिम्बाब्वे संघासाठी ३५ वर्षीय ब्रेंडनने २००४ मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत ३४ कसोटी सामने, २०४ एकदिवसीय सामने आणि ४४ टी२० सामन्यांमध्ये झिम्बाब्वे संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे २३२०, ६६७७ आणि ८५९ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० विकेट्सही घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मिस्टर अन् मिसेस कोहलीला दुबईतील हॉटेलकडून ‘चॉकलेटी सरप्राईज’, खास वेलकमने अनुष्का खुश
स्वागत आहे! सचिन पोहचला युएईत, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह मुलगा अर्जूनलाही देईल ट्रेनिंग
कुणीतरी येणार गं! सीएसकेचा ‘हा’ खेळाडू लवकरच होणार ‘बापमाणूस’, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज