इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा अखेरचा टप्पा लवकरच सुरू होईल. पण, आशातच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम आयपीएलच्या १५ व्या हंगामानंतर फ्रँचायझीची साथ सोडण्याची शक्यता आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार मॅक्यूलम (Brendon McCullum) आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकण्यास सज्ज आहे. तो लवकरच इंग्लंड क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (England Coach) बनू शकतो. त्यामुळे ही नवी जबाबदारी पाहाता मॅक्यूलमने कोलकाताबरोबरचा (Kolkata Night Riders) करार थांबवण्याचा निर्णय घेतला असण्याची चर्चा आहे.
मॅक्यूलमबद्दल कोलकाताच्या (KKR Coach) एका सुत्राने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार त्याने इंग्लंड क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनण्याचा निर्णय घेतला असल्याचे कोलकाता संघव्यवस्थापनाला कळवले आहे. त्याने काही दिवसांपूर्वी संघाच्या बैठकीत याबद्दल माहिती दिली. मॅक्यूलमबाबत यापूर्वीही बरीच चर्चा झाली होती की, तो इंग्लंडचा प्रशिक्षक बनू शकतो. काही महिन्यांपूर्वी ख्रिस सिल्वरवूड यांनी इंग्लंडचे प्रशिक्षकपद सोडले होते.
मॅक्यूलमचे कोलकाताशी चांगले संबंध
मॅक्यूलम आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक होण्यापूर्वी खेळाडू देखील होता. त्याने अनेक हंगामात कोलकाताचे प्रतिनिधित्तव केले होते. पहिल्या हंगामातील पहिल्याच सामन्यात तर त्याने १५८ धावांची ताबडतोड खेळी करत सर्वांना आयपीएल काय असणार आहे, याची झलक दाखवली होती.
तो २०२० आयपीएल हंगामापासून कोलकाता प्रशिक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली २०२० साली कोलकाताला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले होते. कोलकाता ५ व्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर २०२१ मध्ये दुसऱ्या टप्प्यात शानदार कामगिरी करत कोलकाताने अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण, २०२२ मध्ये कोलकाताची कामगिरी खालावली. त्यांनी या हंगामात आत्तापर्यंत १२ पैकी ५ सामने जिंकले असून ७ सामन्यात पराभव स्विकारला आहे.
मॅक्यूलमने कोलकाताबरोबरच कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे.
मॅक्यूलमची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
न्यूझीलंडचा माजी कर्णधार असलेल्या मॅक्यूलमने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०१ कसोटी सामने खेळले असून १२ शतके आणि ३१ अर्धशतकांसह ६४५३ धावा केल्या आहेत. तसेच २६० वनडेत त्याने ५ शतके आणि ३२ अर्धशतकांसह ६०८३ धावा केल्या आहेत. तसेच तो ७१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळला असून २ शतके आणि १३ अर्धशतकांसह त्याने २१४० धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘खूपच निराशाजनक, धावा कमी केल्या आणि…’ कर्णधार सॅमसनने स्पष्ट केले राजस्थानच्या पराभवाचे कारण
प्रेमासाठी काहीही! विराट अनुष्कासाठी चाहत्यांनाही चकमा देत गेला बंगळुरूच्या बेकरीत अन् पुढे…
जडेजा-चेन्नई फ्रँचायझींनी सोशल मीडियावर एकमेंकांना केलं अनफॉलो, सीइओ म्हणतायेत…