इंग्लंडच्या कसोटी संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमने त्यांचा संघात काही महत्वाचे बदल होणार असल्याची माहिती दिली आहे. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सध्या जबरदस्त प्रदर्शन करत आहे, पण कसोटी क्रिकेटपासून तो मागच्या मोठा काळ झाला लांब आहे. आता मॅक्युलमने बटलरच्या कसोटी संघातील पुनरागमनाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंड कसोटी संघाचा नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullum) त्यांच्या संघाचा बिघडलेला फॉर्म पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात आहे. याच कारणास्तव येत्या काळात इंग्लंडच्या कसोटी संघात काही महत्वाचे बदल झालेले दिसू शकतात. मोईन अली आणि आदिल राशीद सारखे महत्वाचे खेळाडू कसोटी प्रकारातून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता आहे. तसेच आयपीएल २०२२ हंगामात धमाकेदार फलंदाजी केल्यानंतर जोस बटलर (Jos Buttler) देखील कसोटी संघात पुनरागमन करेल.
बटलरच्या पुनरागमनाविषयी मॅक्युलम म्हणाला की, “जोस बटलरला जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा विचार करता की, तो एका प्रकारामध्ये किती यशस्वी आहे आणि दुसऱ्या प्रकारात मात्र त्याला जास्त यश मिळाले नाहीये. माझ्या हिशोबाने जर तुम्ही टी२० क्रिकेटमध्ये एवढे यशस्वी आहात, तर कसोटी क्रिकेटमध्ये ही शैली वापरून यशस्वी होऊ शकता. आयपीएलमध्ये मागच्या दोन महिन्यांमध्ये ज्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे, त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच पाहता. अनेक केळाडू असे आहेत, ज्यांना जर पुरेशी संधी मिळाली, तर ते कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःची छाप सोडू शकतात.”
दरम्यान, आयपीएलच्या या १५ व्या हंगामात बटलल चांगलाच चमकला आहे. त्याने आरसीबीविरुद्ध दुसऱ्या क्लालिफायरमध्ये शतकी खेळी करून राजस्थानला अंतिम सामन्यात पोहोचवले. हंगामातील बटलरचे हे वैयक्तिक चौथे शतक ठरले. त्याने या हंगामात खेळेलल्या पहिल्या १७ सामन्यांमध्ये तब्बल ८६३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ५७.५३ राहिला आहे. कसोटी क्रिकेटमधील बटलरची कारकीर्द पाहिली, तर त्याने आतापर्यंत ५७ सामने खेळले आहेत आणि यामध्ये २९०७ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ मधील पुरस्कारांवर बटलरचेच वर्चस्व, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
IPL 2022: फायनलमधील जबरदस्त फटकेबाजीमुळे हार्दिक पंड्या बनला सामनावीर, पाहा याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’