---Advertisement---

“रिंकूकडे खूप काही करून दाखवण्याची क्षमता”, मॅकलमने सांगितल्या जुन्या आठवणी

On: मंगळवार, ऑगस्ट 22, 2023 7:56 PM
---Advertisement---

रिंकू सिंगने आयर्लंड दौऱ्यावर भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये पदार्पण करणाऱ्या रिंकू सिंगने दुसऱ्या सामन्यात पहिला डाव खेळला आणि पहिल्याच सामन्यात रिंकूने सर्वांना प्रभावित केले. रिंकूने आक्रमक फटकेबाजी करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या रचून दिली. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचवेळी न्यूझीलंडचा माजी कर्णधार व इंग्लंड कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम याने देखील त्याचे कौतुक केले.

रिंकू सिंग (Rinku Singh) सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. रिंकूने भारतीय संघासाठी चांगली खेळी केल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटू त्याचे कौतुक करत आहेत. ब्रँडन मॅकलम याने त्याचे कौतुक करताना म्हटले,

“रिंकू सिंग हा एक नम्र व्यक्ती आहे. एक चांगला टीम मॅन आणि शानदार व्यक्ती आहे आहे . त्याच्यासाठी हे कधीच सोपे नव्हते, त्याला प्रत्येक दिवशी संघर्ष करावा लागला. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा आणि विशेष काहीतरी करून दाखवण्यासारखा खेळ आहे.” मॅकलम 2021 व 2022 या दोन वर्ष केकेआर संघाचा भाग होता. त्यावेळी पासून रिंकू हा केकेआरचा सदस्य आहे.

भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने 2-0 अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 33 धावांनी विजय मिळवला. त्याचवेळी, पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी विजय मिळवला होता. आता तिसरा आणि अंतिम सामना बुधवार, 23 ऑगस्ट रोजी डब्लिनमधील द व्हिलेज येथे खेळवला जाईल.

(Brendon McCullum Praised Rinku Singh)

महत्वाच्या बातम्या-  
“धोनीने रोहितला 2011 वर्ल्डकपसाठी डावललेले”, माजी निवडसमिती सदस्याचा धक्कादायक खुलासा
अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये जयपूर पॅट्रीओट्स या नव्या फ्रँचायझीची एन्ट्री

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---