अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर सर्रासपणे केला जात आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणीही सोशल मीडियाला सुट्टी दिलेली नाही. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कलाकार, क्रिकेटपटू, राजकारणी असे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र, अनेकदा त्यांच्याकडून अशा काही चुका होतात, ज्यासाठी त्यांना माफी मागावी लागते. आता असेच काहीसे इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील उपविजेत्या गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्यासोबत घडले आहे. केलेल्या चुकीसाठी यश दयालला माफी मागावी लागली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सांप्रदायिक पोस्ट यश दयालने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती. त्याच्या या स्टोरीचे स्क्रीनशॉट्स जोरदार व्हायरल झाले. मात्र, याची सत्यता तपासता आली नाही, कारण पोस्ट डिलीट करण्यात आली होती. यश दयाल (Yash Dayal) याचे चाहते अशाप्रकारच्या वादग्रस्त पोस्टमुळे खूपच नाराज झाले आहेत. नंतर आणखी एक स्टोरी शेअर करत केलेल्या चुकीप्रकरणी यश दयालने माफी (Yash Dayal Apologizes) मागितली. तो म्हणाला की, ती स्टोरी चुकून पोस्ट झाली होती.
यश दयालने स्टोरी शेअर करत लिहिले की, “मित्रांनो चुकून पोस्ट झालेल्या स्टोरीबाबत मी माफी मागतो. कृपया, द्वेष पसरवू नका. धन्यवाद. मी प्रत्येक समाज आणि समुदायाचा आदर करतो.” आता दयालची ही स्टोरीदेखील व्हायरल होत आहे.

केव्हा आला चर्चेत?
खरं तर, यश दयाल तेव्हा चर्चेत आला, जेव्हा आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रिंकू सिंग (Rinku Singh) याने त्याच्याविरुद्ध षटकातील अखेरच्या पाच चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला होता. उमेश यादव याने पहिली धाव घेतली होती आणि त्यानंतर रिंकूने सलग पाच षटकार मारले होते. अखेरच्या षटकात कोलकाताला 28 धावांची गरज होती.
सामन्यानंतर दयालला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले होते. गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यानेही म्हटले होते की, रिंकूने पाच षटकार मारल्यानंतर तो आजारी पडला होता. तो असेही म्हणालेला की, “रिंकू सिंगकडून पाच षटकार खाल्ल्यानंतर यश दयालचे 7-8 किलो वजन कमी झाले होते.”
विशेष म्हणजे, दयालने हंगामात 5 सामने खेळताना फक्त 2 विकेट्स घेतल्या. (cricketer yash dayal huge controversy after posting a communal instagram story by mistake)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गावसकरांनी WTC Finalसाठी निवडली भारतीय प्लेइंग 11, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गाजवणाऱ्या पठ्ठ्याची हाकालपट्टी
‘मला त्याच्या बॅटिंगवर जास्त विश्वासच नाही’, WTC अंतिम सामन्यापूर्वी हरभजनचे खळबळजनक भाष्य