---Advertisement---

विश्वचषक २०१९: या दिग्गज खेळाडूने वर्तवले सर्व १० संघांचे भविष्य

On: शनिवार, जून 1, 2019 4:26 PM
---Advertisement---

गुरुवारपासून 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या विश्वचषकाआधी अनेक दिग्गजांनी विविध अंदाज वर्तवले आहेत. यात आता न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमचाही समावेश झाला आहे.

सध्या आयसीसी विश्वचषकासाठी समालोचकांच्या टीमचा भाग असलेल्या मॅक्यूलमने साखळीफेरीत कोणते संघ किती विजय मिळवतील याबद्दल आंदाज व्यक्त केला आहे. त्याने त्याचे हे अंदाज एका वहिवर लिहिलेले असून त्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्याने त्याच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की ‘माझे विश्वचषकातील सामन्यांचे अंदाज. 4 संघ हे गुणतालिकेतील चौथ्या स्थानासाठी स्पर्धा करतील आणि नेटरनरेटनुसार पुढील निकाल ठरवेल. तसेच पाऊस आणि नशीब हे सुद्धा मोठी भूमीका निभावतील. आशा आहे न्यूझीलंडला थोडीफार नशीबाची साथ मिळेल आणि ते उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरतील. या ग्रहावरील सर्वोत्तम खेळाडूंच्या सेलिब्रेशनची 6 आठवडे मजा घ्या.’

मॅक्यूलमने या विश्वचषकात वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे साखळी फेरीत भारत आणि इंग्लंड हे दोन संघ प्रत्येकी केवळ 1 सामना पराभूत होतील. तर अन्य सर्व सामने जिंकतील.

तसेच श्रीलंका आणि बांगलादेश केवळ 1 सामना जिंकण्यात यशस्वी होतील. श्रीलंका विंडीज विरुद्ध जिंकेल तर बांगलादेश श्रीलंका विरुद्ध जिंकेल. मात्र याव्यतिरिक्त हे दोन संघ अन्य सर्व सामने पराभूत होतील.

पण त्याचबरोबर विंडीज विरुद्ध श्रीलंका सामन्याचा अंदाज लावता येत नसल्याने त्या दोन्ही संघांच्या समोर या सामन्यात विजय असे लिहिले असल्याचेही ट्विट करुन त्याने स्पष्टीकरण दिले आहे.

त्याचबरोबर अफगाणिस्तानचा संघ 2 सामने जिंकेल. हे दोन सामने ते बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध जिंकतील. मात्र अन्य सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल.

गतविजेते ऑस्ट्रेलिया 6 सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी होतील, तर त्यांना भारत पाकिस्तान आणि विंडीज विरुद्ध पराभव स्विकारावा लागेल.

तसेच न्यूझीलंड, पाकिस्तान, विंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ 5 विजय मिळतील तर 4 सामन्यात पराभूत होतील. त्यामुळे या चार संघात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा पहायला मिळेल. तसेच मॅक्यूलमने वर्तवलेल्या या अंदाजाप्रमाणे 8 विजयांसह भारत आणि इंग्लंड तर 6 विजयांसह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत सहज प्रवेश करेल. मात्र चौथ्या स्थानासाठी संघर्ष होईल.

https://www.instagram.com/p/ByHj1hwHnZI/?igshid=1uxfrakfzwyz1

https://twitter.com/Bazmccullum/status/1134357319951761408

https://twitter.com/Bazmccullum/status/1134364225399283713

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडियाने विश्वचषकातील पहिल्या सामन्याआधी घेतला पेंटबॉल खेळण्याचा आनंद, पहा फोटो

पाकिस्तान विरुद्ध यष्टीरक्षक शाय होपने घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ

विश्वचषक २०१९: आज होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्याचा असा आहे इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment