साधारण २ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेचा अंतिम सामना आता १८ ते २२ जून दरम्यान साऊथॅम्पटन येथे होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघाने बलाढ्य संघांना मागे टाकत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे हे दोन संघ आता पहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी एकमेकांसमोर येतील. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.
सगळ्या क्रिकेट विश्वाच्या नजरा सध्या अजिंक्यपद कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर खिळल्या आहेत. दरम्यान, या सामन्याच्या पार्श्वभूमीवर विलियम्सन आणि विराट यांच्या नेतृत्त्वाची तुलना दिग्गज क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्यूलमने केली आहे.
स्पोर्ट्स टुडेसोबत बोलताना मॅक्यूलमने सांगितलं की, ‘या दोन्ही कर्णधारांनी अतिशय शानदारपणे आपापल्या संघाला आकार दिला आहे. त्यासोबतच हे दोघे स्वतः आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असून अतिशय शानदार फलंदाजी करत आहेत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतचा यांचा प्रवास नक्कीच खडतर होता, परंतु ज्याप्रकारे यांनी आपल्या संघाच मनोबल वाढवलं त्यावरून ते कौतुकास पात्र आहेत.’
नेतृत्वाची तुलना करताना पुढे तो म्हणाला की, ‘आपापल्या संघाच नेतृत्व करण्याची दोघांची पद्धत वेगवेगळी आहे, आपल्या स्वतःच्या प्रदर्शनाने ते संघाला प्रेरित करत असतात. विराट कोहली एक आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जातो तर विलियम्सन दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघावर वरचढ ठरत असतो, परंतु तो विराटसारखा आक्रमक नाही. हे दोघे खेळाडू खऱ्या अर्थाने ह्या खेळाचे ‘सदिच्छादूत’ आहेत.’
असेच अंतिम सामन्यासाठी कोणताही एक संघाला त्यांनी पसंती दिली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिज, इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघ जाहीर; मोईन खान यांच्या मुलाला मिळाली संधी
खेळासाठी काहीही! जेव्हा पाण्याने भरलेल्या खेळपट्टीवर सचिनने केली होती फटकेबाजी, व्हिडिओ व्हायरल
बापरे! तब्बल एवढ्या कोटींचा मालक आहे ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह