---Advertisement---

ब्रेट लीच्या गामे लागला आरसीबीचा चाहता, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिंदीत केल्या सुचना

Brett Lee
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली भारतीय क्रिकेटप्रेमिंमध्ये चांगलाच लोकप्रिय आहेत. ब्रेट ली जगात आतापर्यंत झालेल्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. याच कारणास्तव ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या बाहेर त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. भारतीय चाहत्यांकडून देखील लीला मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या त्याने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे.

भारतीय चाहते ज्या पद्धतीने ब्रेट ली (Brett Lee) याला प्रेम देतात, त्याच पद्धतीने लीदेखील चाहत्यांवर प्रेम करत आला आहे. सध्या भारतात सुरू असेलेल्या आयपीएलसाठी ली क्रिकेट जाणकार म्हणून भूमिका पार पाडत आहे. नुकताच त्याने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून दोन भारतीय चाहत्यायंचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईतील एका रस्तायावरील हा व्हिडिओ आहे, जेव्हा रात्रीच्या वेळी ली आपल्या गाडीतून फिरत होता. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहेले आहे की, “भारत नेहमीच अशा आश्चर्यांनी बरलेला असतो. याठिकाणीच उत्साह आवडतो.”

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत ब्रेट ली हिंदीत बोलतानाही दिसतो. ब्रेट लीची गाडी मुंबईतील रस्त्यांवर फिरताना पाहून दोन चाहत्यांचे लक्ष्य त्याच्याकडे गेले. हे दोघेही दोन चाकी गाडीवर दिसत आहे. त्यातील एकाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा शर्ट देखील घातल्याचे पाहाला मिळते. यो दोघेही ब्रेट लीसोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक आहेत, हे स्पष्टपणे दिसते. पण अशा पद्धतीने गाडीचा पाढलाग करणे सुरक्षीत नाही, हे लक्षात आल्यानंतर ब्रेट ली त्यांना म्हणाला, “आराम से.” लीची हिंदी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. या दोघांना हेलमोट घालण्याचा सल्ला देखील लीने दिला. हा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

https://www.instagram.com/reel/Cq8lL9lAsy8/?utm_source=ig_web_copy_link

आयपीएल 2023 मध्ये राजस्थान सध्या पहिल्या क्रमांकावर
दरम्यान आयपीएलच्या या चालू आयपीएल हंगामाचा विचार केला, तर संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानने बुधवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि गुणतालिकेत पहिला क्रमांक देखील पटकावला. सुरुवातीच्या चार पैकी तीन सामन्यांमध्ये राजस्थानला विजय मिळाला आहे. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर तीन विजयांसह लखनऊ सुपर जायंट्स आणि तिसऱ्या क्रमांकावर दोन विजयांसह कोलकाता नाईट रायडर्स संघ आहेत.  (Brett League advises RCB fan to drive slowly)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

धोनीने जागवल्या पहिल्या आयपीएलच्या आठवणी! तुम्हीही वाचा गुपित ‘तो” किस्सा
VIDEO: पराभवानंतरही दिसला धोनीचा मोठेपणा, ध्रुव जुरेलला दिल्या बॅटिंग टिप्स

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---