---Advertisement---

“कॅलिसच क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान खेळाडू”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक

On: रविवार, जुलै 9, 2023 10:57 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होऊन आता 145 वर्षांचा कालावधी लोटला आहे. क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात सर्वात महान खेळाडू कोण याबाबत नेहमी चर्चा होत असते. ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन, भारताचा सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस यापैकी कोण सर्वात महान क्रिकेटपटू आहे याबाबतची मते अनेकदा व्यक्त केली जातात. आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली याने आपले मत कॅलिसच्या पारड्यात टाकले. ‌

कॅलिसने नुकतीच एका प्रसारण वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्याला आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळाडूंविषयी विचारण्यात आले. याबद्दल बोलताना त्याने दिलखुलासपणे उत्तरे दिली. सर्वकालीन महान खेळाडू कोण असे विचारल्यानंतर तो म्हणाला,

“इतिहासातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून मी जॅक कॅलिस याचे नाव घेईल. त्याने फलंदाजी व गोलंदाजी जगातील सर्व मैदानांवर आपला ठसा उमटवला.”

फलंदाजीतील विविध प्रश्नांवर उत्तरे देताना तो म्हणाला,

“सर्वोत्तम फलंदाज म्हणून मी सचिन तेंडुलकरचे नाव घेईल. त्याच्यात फलंदाजीत एक कलात्मकता होती. तसेच त्याचे तंत्र मजबूत होते. सर्वात आव्हानात्मक फलंदाज मला वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा वाटला. त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना नेहमी अधिकचे प्रयत्न करावे लागले. याव्यतिरिक्त सर्वात त्रासदायक फलंदाज म्हणून मी न्यूझीलंडच्या ख्रिस केर्न्सचे नाव घेईल.”

कॅलिस याच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी खेळताना 166 कसोटी सामन्यांमध्ये 13289 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये देखील त्याच्या नावे तब्बल 11579 धावा जमा असून, 25 टी20 मध्ये 666 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या. याव्यतिरिक्त गोलंदाजीमध्ये कसोटीत 292, वनडेमध्ये 273 व टी20 मध्ये 12 बळी आहेत.

(Brett Lee Said Jaques Kallis Is All Time Great Cricketer Sachin Tendulkar Is Greatest Batter)

महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका बनली क्वालिफायर्स चॅम्पियन! अंतिम सामन्यात उडवला नेदरलँड्सचा खुर्दा
‘विराट FAB 4चा भाग नाही, बाबरचे नाव जोडा…’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---