---Advertisement---

लाराने २२ वर्षांपुर्वी चौथ्या डावात अशी काही फलंदाजी केली की सगळं जग लाराचा झालं फॅन

Brian-Lara
---Advertisement---

आजच्याच दिवशी बरोबर २२ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने नाबाद १५३ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा धक्का दिला होता.

ब्रिजटाऊन येथे २६ ते ३० मार्च १९९९ दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा सामना पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात स्टिव्ह वॉ आणि रिकी पाँटिंगने केलेल्या शतकी खेळींच्या जोरावर ४९० धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडिजला पहिल्या डावात ३२९ धावांवर रोखले होते आणि पहिल्या डावात १६१ धावांची आघाडी घेतली होती.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सर्वबाद १४६ धावच केल्या. या डावात वेस्ट इंडिजचा गोलंदाज कर्टनी वॉल्शने ५ विकेट्स घेतल्या होत्या. परंतू  ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे त्यांनी चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी ३०८ धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने सुरुवात चांगली केली. त्यांच्याकडून शेर्विन कॅम्पबेल ऍड्रिएन ग्रिफीथने ७२ धावांची सलामी भागीदारी रचली. पण कॅम्पबेल बाद झाल्यानंतर लगेचच वेस्ट इंडिजने एकामागोमाग एक अशा ५ विकेट्स १०५ धावांतच गमावल्या. पण तोपर्यंत त्यावेळी वेस्ट इंडिजचे कर्णधारपद सांभाळणारा ब्रायन लारा फलंदाजीसाठी आला होता.

त्याने जीमी ऍडम्सला साथीला घेत ६ व्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचली. पण अखेर ही भागीदारी ग्लेन मॅग्राथने सामन्याच्या शेवटच्या दिवशी १२५ चेंडूत ३८ धावांवर खेळत असलेल्या ऍडम्सला त्रिफळाचीत करत तोडली.

पण असे असले तरी एका बाजूने लाराची झूंझार खेळी चालू होती. मात्र ऍडम्स बाद झाल्यावर पुढच्या २ विकेट्सही मॅग्राथने लगेचच घेतल्या. पण नंतर कर्टली अँब्रोसने लाराला भक्कम साथ दिली. त्या दोघांनी मिळून ९ व्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. मात्र अँब्रोस वेस्ट इंडिजला केवळ ५ धावा हव्या असताना १२ धावांवर बाद झाला. त्यामुळे सामन्यातील रंगत वाढली.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ १ विकेट हवी होती तर वेस्ट इंडिजला ५ धावा हव्या होत्या. अखेर ११ व्या क्रमांकावर खेळायला आलेल्या कर्टनी वॉल्श यांनी ५ चेंडू खेळत लाराला योग्य साथ दिली. लारानेही नंतर जास्त वेळ न घेता दिडशतकी खेळी पूर्ण करत वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.

https://twitter.com/ICC/status/1112044317705732098

लाराने या डावात २५६ चेंडूत नाबाद १५३ धावा केल्या. या खेळीत त्याने १९ चौकार आणि १ षटकार मारला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

राजस्थानविरुद्धच्या पराभवासोबतच हैदराबादच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाचीही नोंद; वाचा सविस्तर

भावामुळे तुला स्लेजिंगला सामोरे जावे लागले का? पाहा हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर काय म्हणाला हार्दिक पंड्या

हैदराबादला लोळवत राजस्थानची विजयी सुरूवात, पाॅइंट टेबलमध्येही थेट टाॅपला; सॅमसन, चहल वियजाचे शिल्पकार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---