क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे त्याच्याशी निगडित क्षण कधीकधी खरोखरच आश्चर्यकारक आणि मनोरंजक असतात. मैदानावर असे काही घडताना दिसते, ज्यावर उघड्या डोळ्यांनी विश्वास ठेवणे कठीण होते. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘द हंड्रेड’ या १०० चेंडूंच्या क्रिकेट स्पर्धेतही असेच दृश्य पाहायला मिळाले आहे. लंडन स्पिरिट आणि मँचेस्टर ओरिजिनल्सच्या पुरुष संघांमध्ये हा सामना होता. या सामन्यादरम्यान ६ सेकंदात असे काही दिसले, जे खरोखरच आश्चर्यकारक होते. ते एक अद्भुत दृश्य होते.
‘द हंड्रेड’ स्पर्धेत लंडन स्पिरिटने मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्धचा सामना जिंकला. प्रथम खेळताना लंडन स्पिरिटने १०० चेंडूत १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मँचेस्टर ओरिजिनल्सचा संघ ९८ चेंडूत १०८ धावा करून सर्वबाद झाला, ज्यामध्ये शॉन ऍबॉटच्या मेसन क्रेनच्या आश्चर्यकारक झेलमुळे एक विकेट पडली.
https://www.instagram.com/reel/ChA7Y0FjzLJ/?utm_source=ig_web_copy_link
मँचेस्टर ओरिजिनल्सचा फलंदाज शॉन ऍबॉटने लंडन स्पिरिट बॉलर थॉम्पसनच्या चेंडूवर एक शॉट खेळला. त्याच्या बॅटने चेंडू आदळल्यानंतर तो वाऱ्यासारखा वर आकाशात गेला. पण क्षेत्ररक्षक मॅसेन क्रेनची नजर त्याच्यावर खिळलेली होती. आणि शेवटी तो झेल त्याने नीट पारखून पकडला.
६ सेकंदात खेळ संपला!
मेसन क्रेनचा झेल पाहण्यास सोपा वाटेल, पण तसे नव्हते. चेंडू हवेत उडेपर्यंत फलंदाजाच्या बॅटला स्पर्श होण्यासाठी आणि नंतर मेसन क्रेनच्या हातात पकडण्यासाठी एकूण ६ सेकंद लागले. आणि यातच शॉन ऍबॉटचा डावही संपुष्टात आला.
या सामन्यात सीन ऍबॉटने ७ चेंडूत १० धावा केल्या. दुसरीकडे, मेसन क्रेनने हा आश्चर्यकारक झेल घेण्याव्यतिरिक्त १८ चेंडूत २१ धावांवर २ फलंदाज बाद केले. या सामन्यात लंडन स्पिरिटने मँचेस्टर ओरिजिनल्सचा ५२ धावांनी पराभव केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अबब! ‘हा’ स्पिन पाहिल्यावर तुम्ही शेन वॉर्न अन् मुरली धरनलाही विसरून जाल
‘मिशन एशिया कप’ फत्ते करण्यासाठी कोहलीने बनवलाय प्लॅन, मुंबईतून करणार सुरुवात
‘रवी शास्त्रींच्या आहेत खूप मोठ्या ओळखी!’, नवीन इंस्टा पोस्ट होतीये व्हायरल