न्यूझीलंड क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज टॉम ब्लंडेल हा आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. टॉम ब्लंडेलचा जन्म १ सप्टेंबर १९९० रोजी वेलिंग्टन येते झाला होता. तसेच २०१७ मध्ये त्याने न्यूझीलंड संघासाठी पदार्पण केले होते. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो वेलिंग्टन संघाचे प्रतिनिधित्व करतो. टॉम ब्लंडेलने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले नसताना देखील २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली होती.
टॉमची २०१० मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही न्यूझीलंड संघासाठी निवड करण्यात आली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर २०१३ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर जून २०१८ मध्ये त्याची २०१८-१९ हंगामासाठी वेलिंग्टन संघात निवड करण्यात आली होती. परंतु नोव्हेंबर २०२० मध्ये २०२०-२१ च्या हंगामात टॉमने मैदानावर अडथळा निर्माण केल्यामुळे संघाबाहेर करण्यात आले होते.
कसोटी पदार्पणात झळकावले होते शतक
जानेवारी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत त्याला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी देण्यात आली होती. परंतु तो या सामन्यात खेळला नव्हता. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये त्याला न्यूझीलंड संघासाठी पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात बीजे वॉटलिंग दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्याऐवजी टॉमला खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचे सोने करत त्याने १०७ धावांची खेळी केली होती. या खेळीसह तो कसोटी पदार्पणात मॅट प्रायरनंतर शतक झळकवणारा दुसराच यष्टिरक्षक फलंदाज ठरला होता. (Brilliant wicketkeeper batsman who scored century on his test debut match)
Happy birthday Tom Blundell, one of only five wicket-keepers to make a century on men's Test debut 🎂 pic.twitter.com/Vc0mSDskMO
— ICC (@ICC) September 1, 2021
विश्वचषक २०१९ स्पर्धेत न्यूझीलंड संघाचे केले प्रतिनिधित्व
एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याची न्यूझीलंड संघात निवड करण्यात आली होती. मुख्य बाब म्हणजे त्यावेळी त्याला एकही वनडे सामना खेळण्याचा अनुभव नव्हता. परंतु त्याला या स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. जानेवारी २०२० मध्ये भारतीय संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत त्याला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती.
टॉमची कारकिर्द जास्त मोठी राहिली नाही. त्याने न्यूझीलंडकडून केवळ ११ कसोटी, २ वनडे आणि ४ टी२० सामने खेळले आहेत.
हेही वाचा-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: लांब केसांमुळे अक्षरश: दंड भरायला तयार होणारा इशांत शर्मा