ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग (बीबीएल) 2022-23 या टी20 पुरुष लीगचा रोमांच सुरू आहे. या लीगच्या 25व्या सामन्यात असे काही दिसले, ज्यामुळे चाहते तो फलंदाज बाद होता की नाबाद होता की षटकार होता, या संभ्रमात पडले आहेत. हा प्रकार रविवारी (1 जानेवारी) ब्रिस्बेन हीट विरुद्ध सिडनी सिक्सर्स या सामन्यात घडला. यामध्ये मायकल नेसर याने तो झेल पकडला. त्याच्या या चकीत करणाऱ्या क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या सामन्यात ब्रिस्बेनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संघाची सुरूवात अडखळत झाली. पहिली विकेट 12 धावसंख्येवर कोलिन मुन्रोच्या रुपात पडली. मुन्रो 10 धावा करत तंबूत परतला. त्यानंतर जोश ब्राऊन याने 23 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने 62 धावा केल्या. तसेच नॅथन मॅकस्वीनी याने 51 चेंडूत 84 धावा केल्या. ज्यामुळे ब्रिस्बेनने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 224 धावसंख्या उभारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनीने चागंली सुरूवात केली. सलामीवीर जेम्स विन्स 24 चेंडूत 41 धावा करत बाद झाला. त्यानंतर जॉर्डन सिल्क याने अप्रतिम फलंदाजी केली. त्याच्या या फलंदाजीने सिडनी सहज सामना जिंकेल असे वाटत असताना मायकल नेसर (Michael Neser) याने त्याचा चकित करणारा झेल घेतला. हा प्रकार 19व्या षटकात घडला तेव्हा मार्क स्टेकेटी गोलंदाजी करत होता.
स्टेकेटीने षटकातील दुसरा चेंडू टाकला असता सिल्कने सीमारेषेवर एक उत्तम शॉट खेळला. हा षटकार असेल असे वाटत असताना नेसरने पळत जाऊन झेल घेतला. तेव्हा त्याने सीमीरेषेपार दोनदा हवेत उडी घेत चेंडू आता ढकलला आणि आत येत तो विचित्र झेल पकडला. तो चेडू एक लीगल होता. यामुळे पंचांनी फलंदाजाला बाद दिले. सिल्क 23 चेंडूत 41 धावा करत बाद झाला. यामुळे सिडनीला सामना 15 धावांनी गमवावा लागला.
This is fascinating.
Out? Six? What's your call? #BBL12 pic.twitter.com/v22rzdgfVz
— KFC Big Bash League (@BBL) January 1, 2023
एमसीसीच्या नियम 19.5.2 नुसार, क्षेत्ररक्षकाचा चेंडूला पहिला संपर्क सीमारेषाच्या आत असणे आवश्यक आहे. मग तो किंवा ती सीमेपलीकडे गेला किंवा गेली असूनसुद्धा ग्राऊंडवर असतो.
क्षेत्ररक्षक एकाच वेळी चेंडू आणि जमिनीला सीमारेषेपलीकडे स्पर्श करू शकत नाही. या सामन्यात नेसरने झेल घेतला तेव्हा तो सीमारेषापार जाऊन हवेत चेंडूला स्पर्श केला होता. नंतर त्याने आत येत झेल घेतला. यामुळे फलंदाज बाद झाला.
(Brisbane Heat vs Sydney Sixers, 25th Match Brisbane Michael Neser grabs unbelievable catch)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
DEXA टेस्ट म्हणजे काय रे भाऊ? भारतीय खेळाडूंना संघप्रवेशासाठी ही चाचणी पार करावीच लागणार
पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत रामकुमार रामनाथनचा मुख्य फेरीत प्रवेश