इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सुरु आहे. लॉर्ड्सवरील सामना गमावल्यानंतर इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात मात्र चांगलेच पुनरागमन केले आहे. परंतु पहिल्या डावातील दयनीय अवस्थेनंतर भारतीय संघानेही सामन्यावर पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने तिसऱ्या दिवसाखेर संघाला २१५ धावांपर्यंत पोहचवले आहे. यादरम्यान खूप हास्यास्पद किस्सा घडला.
तो म्हणजे, इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय संघासोबत क्षेत्ररक्षण करण्याचा हट्ट करणारा ब्रिटिश नागरिक जार्वो याचा किस्सा. लॉर्ड्स येथे या ब्रिटिश नागरिकाने भारतीय संघासोबत क्षेत्ररक्षण करण्याचा हट्ट केला होता. तसेच नंतर सोशल मीडियावर त्याने ‘भारतीय संघाकडून खेळणारा पहिला ब्रिटिश नागरिक’ असे लिहित एक पोस्ट देखील केली होती. ज्यानंतर तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.
तसेच काहीसे पुन्हा घडले. तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील पुन्हा हा ब्रिटिश नागरिक मैदानात आला होता. मात्र यावेळी किस्सा जरा उलटा आहे. यावेळी या ब्रिटिश नागरिकाने क्षेत्ररक्षणाचा नव्हे तर फलंदाजी करण्याचा हट्ट केला आहे. भारतीय संघ त्यांच्या दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला होता. यादरम्यान केएळ राहुलच्या पहिल्या विकेटनंतर भारतीय संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली होती.
मात्र ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा पायचीत झाला. यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्णधार कोहली फलंदाजीस येणे आवश्यक होते. मात्र कोहलीऐवजी अचानकपणे हा ब्रिटिश नागरिक मैदानात आला. ज्यानंतर त्याने ‘बॅटिंग गार्ड’ देखील घ्यायला सुरुवात केली होती. या घटनेला पाहून सामन्यातील पंच देखील आश्चर्यचकित झाले. तसेच मैदानात असलेला चेतेश्वर पुजारा देखील थोड्या वेळासाठी बुचकाळ्यात पडला होता.
https://twitter.com/CricketMate_/status/1431273657423204352?s=20
Jarvo69 is a legend#jarvo #INDvsEND #ENGvIND pic.twitter.com/cv3uxlpu2T
— raghav (@raghav_padia) August 27, 2021
यानंतर मैदानातील सुरक्षारक्षकांनी पुन्हा जार्वोला धरून मैदानाच्या बाहेर नेले. यावेळी देखील पुन्हा असाच किस्सा घडल्यामुळे जार्वोचा हा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याचसोबत अनेक भारतीय चाहत्यांनी जार्वोला सोशल मीडियावर आपल्या संघातील एक खेळाडू म्हणून देखील घोषित केले.
https://twitter.com/virooting/status/1431280236969152517?s=20
दरम्यान, इंग्लंड संघाला पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. सलामीचा फलंदाज केएल राहुल स्वस्तात बाद झाला होता. मात्र, यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरला. रोहित ५९ धावांवर बाद झाला. पुढे दुसऱ्या दिवसाखेर पुजाराने नाबाद ९१ धावा आणि कोहलीने नाबाद ४५ धावा करत संघाच्या २१५ धावा फलकावर लावल्या. अजून भारताला इंग्लंडचे आव्हान गाठण्यासाठी १३९ धावांची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–अद्भुत, अविश्वसनीय! जॉनी बेयरस्टोने घेतला एकहाती अप्रतिम कॅच; पाहा व्हिडिओ
–भारीच! इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा रोहित शर्मा ठरला केवळ तिसराच भारतीय सलामीवीर
–परदेशात कधी येणार हिटमॅनचे शतक? रोहितने नको असलेल्या यादीत गाठले चौथे स्थान