बिग बॅश लीगच्या 12व्या हंगामाची सुरुवात जोरदार झाली आहे. पहिल्याच सामन्यात एकाच खेळाडूने दोन अविश्वसनीय झेल घेतले, ज्यामुळे सर्वच हैराण झाले. क्रिकेटच्या मैदानात याआधी असे झेल क्वचितच बघायला मिळाले असतील. एकाच सामन्यात दोन अविश्वसनीय झेल घेणारा खेळाडू आहे ब्रॉडी काऊच, ज्याने पहिला झेल सायकलकिकच्या शैलीत घेतला. तर दुसरा झेल पळत असताना हवेत उडी मारत घेतला. दुसरा झेल पाहून तर फलंदाजही आश्चर्यचकित झाला.
बिग बॅश लीगमधील पहिला सामना मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर्स या संंघांमध्ये खेळवला गेेला. या सामन्यात मेलबर्नने पहिल्यांदा फंलदाजी करत 8 गडी गमावत 122 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनीने शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य प्राप्त केले आणि एका विकेटनेे हा सामना जिंकला.
बदली खेळाडूने घेतले अविश्वसनीय झेल
आव्हानाचा पाठलाग करताना सिडनीने आपले दोन मुख्य फलंदाज 0च्या धावसंख्येवरच गमावले होते. या दोन्ही फलंदाजांना ट्रेंट बोल्ट यानेे बाद केले. त्यानंतर फलंदाजांनी थोडे योगदान देत संघाला विजयापर्यंत पोहोचवले. मेलबर्न स्टोर्स (Brody Couch) संघाच्या गोलंदाजांनी सिडनीच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होतेे, अशातच मेलबर्नचा बदली क्षेत्ररक्षक ब्रॉडी काऊच याने आपल्या क्षेत्ररक्षणाने हैरान करुन सोडले. सर्वात आधी त्याने पहिल्याच षटकात मॅथ्यू याचा झेल घेतला. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग वर त्याच्या हातून एक झेल सुटला होता. मात्र, त्यानंतर त्याने एक अविश्वसनीय झेल घेतला, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
https://twitter.com/BBL/status/1602606214877093888?s=20&t=03kVuUiDp2oKi-KQr5cP0w
फलंदाजही झाला आश्चर्यचकित
काऊच हा दुखापतग्रस्त जॉ बर्न्स (Joe Burns) याचा बदली खेळाडू म्हणून मैदानात आला होता. हा झेल घेतल्यानंतर त्याने 20व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर क्रिस ग्रीन (Chris Green) याचा हवेत उडी मारत झेल घेतला. या सामन्यातील हा त्याचा दुसरा अविश्वसनीय झेल होता. ग्रीन याला वाटत होते की चेंडू सीमारेषेपलीकडे जाईल. मात्र, काऊचने झेल पकडला. हा झेल पाहून ग्रीन देखील हैराण झाला आणि त्याला एकटक पाहिल्यानंतर तंबूत परतला.
https://twitter.com/7Cricket/status/1602627237026603008?s=20&t=gWsLNxdJpn__QPSevf6iJQ
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही रिषभला काहीही बोलत नाही”; टीम इंडियाच्या प्रशिक्षकांचा धक्कादायक खुलासा
अखेर सचिनच्या अर्जुनने ठेवले रणजीच्या रणांगणात पाऊल! संपली तीन वर्षांची प्रतीक्षा