फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022 स्पर्धा कतारमध्ये खेळली जात आहे. या 22व्या हंगामात ग्रुप एचमध्ये मंगळवारी (29 नोव्हेंबर) स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याचा संघ पोर्तुगलने उरुग्वेला 2-0ने पराभूत केले. त्याचबरोबर पोर्तुगल या हंगामाच्या अंतिम 16 मध्ये प्रवेश करणारा ब्राझिल आणि फ्रांसनतर तिसरा संघ ठरला. या सामन्यात दोन्ही गोल ब्रुनो फर्नांडिस याने केले.
उरुग्वेविरुद्ध पोर्तुगलसाठी स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) विषेश काही करू शकला नाही आणि दुसरीकडे ब्राझिल संघही नेमारशिवाय खेळला. त्यांनी स्वित्झर्लंडला 1-0 असे पराभूत केले.
पोर्तुगल आणि उरुग्वे यांच्यात पहिल्या 45 मिनिटांचा खेळ 0-0 असा बरोबरीत राहिला. दुसऱ्या सत्राच्या 10 मिनिटांतच पोर्तुगलने गोल केला. गुरेरो याने पास केलेला बॉल ब्रुनो फर्नांडिस (Bruno Fernandes) याने त्याचे गोलमध्ये रुपांतर केले आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्यात अधिक वेळ दिला गेला, ज्यामध्ये 90+3 ऱ्या मिनिटाला पुन्हा एकदा ब्रुनोने गोल करत संघाला मजबूत स्थितीत आणले. त्याने हो गोल पेनाल्टीमार्फत केला.
या सामन्यात दोन्ही संघांनी एकूण 6 शॉट्स खेळले ज्यातील 3 टारगेटवर लागले, मात्र पोर्तुगलचा गोलकिपर दियोगो कोस्टा याचा उत्तम बचाव का उरुग्वेचे नशीब वाईट त्यांना एकही गोल करता आला नाही. तसेच ब्रुनोने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळताना दोन गोल आणि दोन असिस्ट केले आहेत.
पोर्तुगलच्या विजयाने संघ ग्रुपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांचे 6 अंक झाले आहेत. तर उरुग्वे एक पराभव आणि एक ड्रॉ यांमुळे एका अंकासह गुणतालिकेत तळाला आहे. त्यांना या स्पर्धेत आपले आव्हान टिकून राखण्यासाठी शुक्रवारी (2 डिसेंबर) घानाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करणे आवश्यक आहे. तसेच दक्षिण कोरिया हरला तर त्यांना पुढील फेरीत पोहण्याची पक्की आशा आहे. गुणतालिकेत घाना तीन अंकासह दुसऱ्या आणि दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे.
Two from Bruno Fernandes sends 🇵🇹 @selecaoportugal to the Round of 16.@adidasfootball | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 28, 2022
या स्पर्धेत आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. पहिले तर अर्जेंटिनाला सौदी अरेबियाने, बेल्झियमला मोरोक्कोने पराभूत केले. Bruno Fernandes’s two goal vs Uruguay in FIFA World Cup 2022 helps Portugal Enter in Last 16
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गद्रे मरीन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत चंदन शिवराज, तरुण कोरवार यांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला
नो नेमार नो चिंता! स्वित्झर्लंडला हरवत ब्राझिल अंतिम 16मध्ये दाखल, ‘हा’ मोठा विक्रम केला नावावर