सध्या प्रो कबड्डी लीग (पीकेएल)च्या ९व्या हंगामासाठी प्लेअर ऑक्शनला सुरुवात झालली आहे. या ऑक्शनमध्ये इरानचा अष्टपैललू खेळाडू मोहम्मद नबी बक्ष या खेळाडूचे नाव पहिल्या क्रमाकांवर बोली लावण्यासाठी पुढे आला. त्याच्यावर पुणेरी पलटन संघाने तब्बल ८७ लाखाची बोली लावत त्याला संघात सामील करून घेतले.
https://twitter.com/PuneriPaltan/status/1555557107126398977
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पढे आलेल्या फझल अत्राचललीवर बोली लावण्यास जोरदार सुरूवात झाली. अन् फझल पीकेएलच्या ९व्या हंगामातील पहिला कोट्याधीश ठरला. फझलवर तब्बल १ कोटी ३८ लाखांची बोली लागलील. शिवाय फझललला देखील पुणेरी पलटन संघाने आपल्या ताफ्यात सामावून घेतले. त्यामुळे आता मोहम्मद नबीबक्ष अन् फझल अत्राचली हे दोघेही महान खेळाडू यंदा एकत्रित पुणेरी पललटन संघासाठी खेळताना दिसतील. शिवाय पुणेरी पलटन संघाला फझल अत्राचलीच्या रुपात एक नवा कर्णधार मिळाल्याची देखीलल संभावना वर्तवली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नवदिप सैनी काऊंटी क्रिकेटमध्ये जाऊन करतोय गोलंदाजांची धुलाई, पाहा व्हिडिओ
कसोटी क्रिकेटमुळे भारताचे दोन ‘रवी’ एकमेकांशी भिडले, वाचा काय आहे प्रकरण
CWG 2022| सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा केला गेला कुस्ती हॉल; भारतीय कुस्तीपटूच्या बाऊटनंतर…






