पुढील महिन्यात भारतीय संघ छोटेखानी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका होईल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराह याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर एशियन गेम्समध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला उपकर्णधार करण्यात आले. अशात या दौऱ्यासाठी काही खेळाडूंना संधी देण्यात आली तर काही अनुभवी खेळाडूंकडे दुर्लक्ष करण्यात आले.
या दौऱ्यावर मोठ्या कालावधीनंतर दुखापतीमुळे संघाबाहेर असलेले तीन खेळाडू पुनरागमन करत आहेत. यामध्ये कर्णधार जसप्रीत बुमराह, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर व वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. मोठा अनुभव असलेल्या या खेळाडूंमुळे संघाला बळकटी आलेली दिसते. त्याचवेळी आयपीएलपासून मोठी चर्चा होत असलेल्या जितेश शर्मा व रिंकू सिंग यांना चांगल्या कामगिरीचे बक्षिस भेटले असून, भारतीय संघाची जर्सी परिधान करण्याची संधी त्यांना मिळू शकतो. एशियन गेम्ससाठी जाणाऱ्या संघात देखील त्यांचा समावेश आहे. त्याचवेळी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून शिवम दुबे व शाहबाज अहमद हे पुन्हा एकदा भारतीय संघात आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरले.
या सर्वांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा राहुल त्रिपाठी, जम्मू कश्मीरचा उमरान मलिक, अष्टपैलू दीपक हुड्डा व व्यंकटेश अय्यर यांना संघात आपली जागा बनवण्याची यश आले नाही. भारतीय संघाचे पुढील वेळापत्रक पाहता या खेळाडूंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
(Bumrah Krishna Sundar Get Second Chance Rahul Tripathi Deepak Hooda Dropped)
महत्वाच्या बातम्या –
सूर्या-हार्दिकला खरच विश्रांतीची गरज आहे का? आयर्लंड दौऱ्यातून घेतली माघार
बुमराहला कमबॅकचे बक्षीस की बीसीसीआयचा प्लॅन? थेट कर्णधारपद दिल्याने उंचावल्या भुवया