सूर्या-हार्दिकला खरच विश्रांतीची गरज आहे का? आयर्लंड दौऱ्यातून घेतली माघार

वेस्ट इंडीज दौरा समाप्त झाल्यानंतर भारतीय संघ थेट आयर्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये एकाही अनुभवी खेळाडूचे नाव नाही. विशेष म्हणजे आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या व उपकर्णधार सूर्यकुमार यादव हेदेखील संघाचा भाग नाहीत. त्यांना विश्रांती दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी संघाचे नेतृत्व पुनरागमन करत असलेला जसप्रीत बुमराह करेल. तर उपकर्णधारपदी ऋतुराज गायकवाड याचे नाव घोषित केले गेले. या दोघांव्यतिरिक्त बरीच नवीन नावे संघात आहेत. तसेच अनेक खेळाडू मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन करत आहेत. त्यामुळे एक युवा संघ आयर्लंडला टक्कर देईल.
या दौऱ्यासाठी मागील जवळपास सहा महिन्यांपासून सातत्याने भारतीय टी20 संघाचे नेतृत्व करत असलेल्या हार्दिक पंड्या याला देखील संधी मिळाले नाही. त्याच्यासह उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादव याला देखील विश्रांती दिल्याचे सांगण्यात आले. हे दोन्ही खेळाडू आयपीएलनंतर फारसे क्रिकेट खेळलेले नाहीत.
हे दोघेही कसोटी संघाचा भाग नसल्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप तसेच वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी झाले नव्हते. त्यानंतर, हे दोघे केवळ आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत तीन सामने खेळतील. त्यानंतर पाच सामन्यांची टी20 मालिका ते खेळणार आहेत. अशा स्थितीत त्यांना विश्रांती दिल्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हेच खेळाडू आयपीएल मध्ये दोन महिन्याच्या कालावधीत सलग पंधरा ते सोळा सामने खेळत असतात. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच त्यांच्या वर्क लोड मॅनेजमेंटचा विचार का केला जातो? असा प्रश्न चाहते विचारतायेत.
(Why Hardik Pandya And Suryakumar Yadav Rested For Ireland Tour)
महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । चौथ्या दिवसाखेर इंग्लिश चाहत्याचा ख्वाजाशी पंगा! लॅबुशेननं मागे वळून काय केलं पाहाच
धोनीने कलेक्शनमधून बाहेर काढली ‘ही’ जबरदस्त मसल कार, रांचीत ड्राईव्ह करतानाचा व्हिडिओ व्हायरल