‘आम्हाला आणखी एक संधी आहे त्यामुळे आम्ही निरास झालो नाही,’ असे वक्तव्य राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर जोस बटलर याने केले आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यानंतर बटलरने हे भाष्य केले आहे. या सामन्यात बटलरने ८९ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीमुळे राजस्थान प्रथम फलंदाजी करत असताना १८८ धावा बनवण्यात यशस्वी ठरली. मात्र, डेविड मिलर आणि हर्दिक पंड्याच्या खेळीमुळे राजस्थानला ७ विकेट्सने पराभव पत्कारावा लागला.
सामन्यात पराभव मिळाल्यानंतर जोस बटलर (Jos Buttler) याने प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना बटलर म्हणाला की, “मी खेळपट्टीवर खेळायला आलो, तेव्हा मला टिकून रहायचे होते. महत्त्वाचा सामना असल्याने आम्हाला चांगली धावसंख्या बनवणे गरजेचे होते. विरोधी संघाला वाटत होते की, मी घाबरावे आणि लवकर बाद व्हावे. मात्र, मी माझा संयम सोडला नाही. माझा स्वत:वर विश्वास होता. त्यामुळे मी शेवटपर्यंत खेळण्यास यशस्वी ठरलो.”
“अजून आम्ही आयपीएलमधून बाहेर गेलो नाही. आम्हाला आणखी एक संधी उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही निराश आहोत. मात्र, या सामन्यात झालेल्या चुका पुढील सामन्यात सुधारण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू,” असे देखील बटलरने सांगितले.
दरम्यान, पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानता कर्णधार संजू सॅमसन याने खेळायला आल्यावर पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यामुळे बटलरवरील दबाव कमी होण्यास मदत झाली. संजूच्या खेळीमुळे माझ्यावरील दबाव कमी होण्यास मदत झाली असल्याचंही बटलरने सांगितले.
सामन्याचा आढावा
गुजरात टायटन्स संघाने आयपीएलच्या १५व्या हंगामातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानला ७ विकेट्सने नमवत पहिल्यांदा थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला. गुजरातकडून डेविड मिलर (David Miller) याने ६८ धावा, हार्दिक पंड्या याने ४० धावा, शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी प्रत्येकी ३५ धावा चोपल्या. राजस्थानविरुद्ध विजय मिळवत त्यांनी पहिलाच हंगाम खेळताना थेट अंतिम सामना गाठणाऱ्या संघांच्या यादीत आपलेही नाव नोंदवले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ६ विकेट्स गमावत १८८ धावा केल्या होत्या.
महा स्पोर्ट्सच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘माणसांकडूनच चूका होतात’, गांगुलीकडून विराट-रोहितची पाठराखण
‘माझ्या खेळीवर टीका केली जायची, त्यामुळे मी…’, गुजरातच्या मॅचविनर पठ्ठ्याची मोठी प्रतिक्रिया
…तर कसोटीमध्ये १० हजारपेक्षा जास्त धावा केल्या असत्या, सेहवागने जाहीर केले दु:ख






