---Advertisement---

‘…याचे सर्व श्रेय एमएस धोनीला’, बटलरने केले कौतुक

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 1:28 AM
---Advertisement---

जगप्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात धमाकेदार झाली आहे. १२ एप्रिल रोजी हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भिडले. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जोस बटलरने भारताचा दिग्गज यष्टीरक्षक व सध्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचे कौतुक केले होते.

धोनी एक महान कर्णधार
राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू आणि सलामीवीर जोस बटलरने पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला एका क्रिकेट संकेतस्थळावर आगामी आयपीएलबाबत चर्चा केली. यावेळी बटलरने एमएस धोनीचे तोंडभरून कौतुक केले.

बटलर म्हणाला, “सध्या आयपीएल आणि जागतिक क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकांना कर्णधार बनवले जात आहे आणि याचे श्रेय धोनी व त्याने घेतलेल्या अद्भुत निर्णयांना जाते. यष्टीरक्षक यष्ट्यांमागून संपूर्ण खेळावर नियंत्रण ठेवू शकतो. धोनी एक महान कर्णधार आहे आणि सर्वजण त्याच्यासारखी कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतात. नव्या हंगामात आमच्याकडे बेन स्टोक्स व ख्रिस मॉरिस यांच्यासारखे दर्जेदार अष्टपैलू आहेत. संजूसारखा नवा परंतु राजस्थानसाठी गेली अनेक वर्षे खेळणारा कर्णधार आहे. या हंगामात आम्ही चांगली कामगिरी करू.”

बटलरने यावेळी राजस्थानचा नवा प्रशिक्षक कुमार संगकाराचे देखील कौतुक केले. त्याच्याविषयी बोलताना बटलर म्हटला, “संगकाराच्या संघाशी जोडल्याने खेळाडूंना फायदा होईल. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलचा भरपूर अनुभव आहे. कोणत्या खेळाडूकडून किती अपेक्षा ठेवायची हे त्याला माहीत आहे.”

यावर्षी राजस्थान रॉयल्स संतुलित संघ भासत आहे. संजू सॅमसन, जोस बटलर, बेन स्टोक्स, यशस्वी जयस्वाल, लियाम लिव्हींगस्टोन, डेव्हिड मिलर, रियान पराग यांच्यासारखे फलंदाज तर, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, शिवम दुबे अष्टपैलू खेळाडू आहेत. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची कमी मात्र संघाला नक्की जाणवेल. त्याच्या जागी अँड्रु टाय अथवा मुस्तफिजुर रहमान यांना संधी मिळेल. कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया असे भारतीय युवा गोलंदाज संघात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

अविश्वसनीय! चेतन सकारियाने आयपीएल पदार्पणातच घेतला डोळ्यांचे पारणे फेडणारा भन्नाट झेल

पंजाबविरुद्ध तीन विकेट्स घेणाऱ्या चेतन सकारियाच्या भावाने ३ महिन्यांपूर्वी केलीये आत्महत्या; वाचा त्याचा संघर्षपूर्ण प्रवास

IPL2021 RRvsPBKS : कर्णधार संजू सॅमसनचे वादळी शतक व्यर्थ, पंजाब किंग्सचा शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---