चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची आज (4 आॅगस्ट) उपांत्य फेरीतील सामना जपानच्या अकान यमागुची विरुद्ध होणार आहे.
याआधी सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्याच नोझोमी ओकुहाराला 21-17,21-19 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत करत वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेतील चौथे पदक निश्चित केले आहे.
विशेष म्हणजे ओकुहाराने मागच्या वर्षी याच स्पर्धेत अंतिम सामन्यात सिंधूला पराभूत करत सुवर्णपदक मिळवले होते.
तसेच उपांत्य फेरीत सिंधूची प्रतिस्पर्धी असलेली यमागुचीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या चेन युफेईला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
तिसरे मानांकन असणारी सिंधू आणि दुसरे मानांकन असणारी यमागुची या दोघी याआधी 10 वेळा आमनेसामने आल्या असून यात सिंधूने 6 वेळा विजय मिळवला आहे आणि यमागुचीने 4 वेळा सिंधूवर मात केली आहे.
तसेच या वर्षी या दोघी दोन वेळा आमने सामने आल्या असून बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने विजय मिळवला होता. तर आॅल इंग्लंड ओपनमध्ये यमागुची विजेती ठरली होती.
आज होणाऱ्या सामन्यात जर सिंधूने विजय मिळवला तर ती अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिन किंवा चीनच्या हे बिंगजीआओशी होइल. मरिन आणि बिंगजीआओ यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे.
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत याआधी सिंधूने 3 पदके मिळवली आहेत. यात तिने 2013 आणि 2014 ला कांस्यपदक तर 2017 ला रौप्यपदक मिळवले आहे.
तसेच यावर्षी सिंधू व्यतिरिक्त अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंचे या स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अनोखी कहानी- क्रीडा क्षेत्रात असेही करियर करता येते
–कोहलीला भेटायच स्वप्न भंगल, विजय मल्ल्याचा या कारणामुळे झाला हिरमोड
–१३ आकडा टीम इंडियासाठी ठरणार अनलकी?