---Advertisement---

खेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार

On: बुधवार, जानेवारी 16, 2019 2:51 PM
---Advertisement---

पुणे । मुष्टीयुद्धासारख्या रांगड्या खेळामध्ये पुरुषांचे प्राबल्य असताना भारताच्या एम.सी मेरी कोम हिने आॅलिंपिक क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक मिळवित सनसनाटी कामगिरी केली. दोन अपत्ये असताना जिद्दीला अफाट मेहनतीची जोड देत तिने हे यश मिळवित सुपरमॉम अशी ख्यातीही मिळविली आहे. तिच्यासारखे या खेळात करिअर करू इच्छिणाºयांची संख्या वाढत आहे. तिच्याच अकादमीत प्रशिक्षण घेणाºया एन.बेबीरोजीसाना चानू हिच्याकडे मेरी कोमची वारसदार म्हणून पाहिले जात आहे.

मणीपूरची खेळाडू चानू ही पुण्यात सुरु असलेल्या खेलो इंडिया महोत्सवातील सतरा वषार्खालील गटात सहभागी झाली आहे. ५० ते ५२ वजनी गटात ती सहभागी झाली आहे. चानू हिने आशिया चषक अजिंक्यपद स्पर्धा, कनिष्ठ महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सोनेरी कामगिरी केली आहे. त्याखेरीज तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली आहे. मेरी कोम हिने स्थापन केलेल्या मुष्टीयुद्ध अकादमीतच ती दररोज सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास सराव करीत आहे. तिला जितेनसिंग व अमन मेवेन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

चानू हिला लहानपणापासून फुटबॉलचे आकर्षण होते. तथापि मेरी कोम हिने जागतिक स्तरावर मिळविलेल्या यशानंतर आपणही तिच्यासारखे मुष्टीयुद्धात करिअर केले पाहिजे असे तिने ठरविले. अर्थात हे करिअर करणे आर्थिकदृष्ट्या सोपे नाही याची जाणीव तिला आहे. त्यातच तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. तिचे वडील शेतकरी असून त्यामधून मिळणाºया तुटपुंज उत्पन्नावरच त्या कुटुंबाला अवलंबून रहावे लागते. मेरी कोम अकादमीतूनच चानू हिला खेळासाठी आर्थिक सहकार्य मिळत आहे.

मेरी कोमविषयी सतरा वर्षीय खेळाडू चानू म्हणाली, मेरी कोम ही माझ्यासाठी दैवत आहे. अगदी एखाद्याा आईसारखीच ती आमच्यावर माया करीत असते. खेळासाठी योग्य तो आहार, वैद्यकीय सहाय्य, तंदुरुस्तीकरिता पूरक व्यायामाची साधने आदी सर्व गोष्टी आम्हाला वेळेवर मिळतात याची काळजी ती नेहमीच करीत असते. परदेशात स्पर्धेस ती गेली तरी दररोज आमच्या सरावाबाबत ती विचारपूस करीत असते. राज्य संघटनेकडून फारशी आर्थिक मदत मिळत नाही. साहजिकच मेरी कोम ही तिला मिळणाºया विविध पुरस्कारांच्या रक्कमेचा विनियोग आमच्यासारख्या नवोदित खेळाडूंकरिता करीत असते. मेरी कोम हिच्यासारखे आॅलिंपिक पदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे. २०२० च्या आॅलिंपिकसाठी मी भरपूर मेहनत करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे

सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी

एमएस धोनी इज बॅक!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment