---Advertisement---

काय सांगता! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विराट कोहलीला केले या संघाचा कर्णधार

On: मंगळवार, डिसेंबर 24, 2019 8:27 PM
---Advertisement---

भारताच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) मागील 10 वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद  विराट कोहलीकडे (Virat Kohli) सोपविण्यात आले आहे.

विराट कोहलीने आपल्या नेतृत्वात भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने 2019मध्ये 8 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, उर्वरित एक सामना अनिर्णित ठरला होता.

कोहलीने आतापर्यंत 84 कसोटी सामन्यात 54.97 च्या सरासरीने 7202 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 22 अर्धशतके आणि 27 शतकांचा समावेश आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या या कसोटी संघात सलामीवीर फलंदाज म्हणून इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक (Alastair Cook) आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वाॅर्नरला (David Warner) निवडण्यात आले आहे.

त्याचबरोबर, तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला (Kane Williamson) स्थान देण्यात आले आहे. तर, मधल्या फळीत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि विराटसोबत एबी डिविलियर्सला (AB de Villiers) ठेवण्यात आले आहे.

या कसोटी संघात अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सचाही (Ben Stokes) समावेश करण्यात आला आहे. त्याने इंग्लंडला विश्वचषक जिंकूण देण्यासाठी मोठा वाटा उचलला होता.

या कसोटी संघात गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn), इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅड (Stuart Broad) आणि जेम्स अँडरसनलाही (James Anderson) स्थान देण्यात आले आहे.

तसेच, या संघात नेथन लायन (Nathan Lyon) या एकमेव फिरकीपटू गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे.

या दशकातील क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेला सर्वोत्कृष्ट कसोटी संघ-
ऍलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, बेन स्टोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, नेथन लायन, जेम्स अँडरसन

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---