---Advertisement---

ईडन गार्डन्सवर द‌.आफ्रिकेशी भिडणार 70 हजार विराट! कॅब करणार कोहलीच्या ‘बर्थ डे’चे जंगी सेलिब्रेशन

On: सोमवार, ऑक्टोबर 30, 2023 11:25 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून येत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वातील या संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व सहा सामने जिंकले असून, ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ आपला सातवा सामना श्रीलंकेविरुद्ध तर आठवा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा विराट कोहली याच्यासाठी खास ठरेल. कोलकाता येथे होणाऱ्या या सामन्यासाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब) यांनी मोठी तयारी केली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा साखळी फेरीतील आठवा सामना 5 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. सध्या हे दोन्ही संघ उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत. हा सामना विराट कोहली याच्यासाठी खास असेल. कारण विराट या दिवशी आपला वाढदिवस साजरा करत आहे. विराटचा हा 35 वा वाढदिवस कॅब विशेष बनवण्याच्या प्रयत्नात आहे.

या सामन्यासाठी उपस्थित राहणाऱ्या तब्बल 70 हजार प्रेक्षकांना कॅब विराट कोहलीच्या चेहऱ्याचे मुखवटे देईल. यासोबतच मैदानावर विराट कोहली च्या वाढदिवसानिमित्त खास केक देखील कापण्यात येईल. तसेच विराटच्या विक्रमांचे तसेच चेहऱ्याचा खास लेझर शो देखील आयोजित करण्यात येईल. तसेच मैदानावर फटाक्यांची आतिषबाजी देखील होईल.

विराट कोहली या विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्याने सहा सामने खेळताना आत्तापर्यंत तीन अर्धशतके व एक शतक झळकावलेय. या सामन्यात त्याच्याकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा असतील.

(CAB Planned Special Birthday Celebration At Eden Gardens In India South Africa Match)

महत्वाच्या बातम्या – 
मैं हू ना! कुलदीपने चाहत्यांना सांगून उडवलेल्या बटलरच्या दांड्या 
महाराष्ट्र U19 संघ बनला विनू मंकड ट्रॉफीचा चॅम्पियन! अर्शिन कुलकर्णीचे शानदार शतक, मुंबई पराभूत 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---