---Advertisement---

बंगाल क्रिकेट असोसिएशनने घेतला मोठा निर्णय; चाहत्यांना दिली ही खूशखबर

On: मंगळवार, नोव्हेंबर 26, 2019 4:51 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध बांगलादेश संघात इडन गार्डन, कोलकाता येथे झालेला दिवस-रात्र कसोटी सामना तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच संपला. या सामन्यात भारताने रविवारी  1 डाव 46 धावांनी विजय मिळवला.

त्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवसाचे तिकीट खरेदी केलेल्या चाहत्यांना पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी पहिल्या तीन दिवस प्रेक्षकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. बंगाल क्रिकेट असोसिएशननेही स्पष्ट केले होते की सामन्याच्या पहिल्या तीन दिवसात रोज 50 हजारांपेक्षा अधिक चाहते उपस्थित राहत होते. तसेच चौथ्या दिवसाची तिकिटेही विकली गेली होती. परंतु हा सामना तिसऱ्याच दिवशी संपला.

त्यामुळे आता इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार या सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवसाचे तिकिट खरेदी केलेल्या चाहत्यांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्याचा निर्णय बंगाल क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे.

‘चौथ्या आणि पाचव्या दिवसाच्या तिकिटांची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोन दिवसांसाठी बुकिंग केलेल्या सर्व ऑनलाइन ट्रान्झॅक्टर्सना मेसेजेस पाठविण्यात येणार आहेत’, अशी माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

तसेच बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अविषेक दालमिया म्हणाले की, ‘बंगाल क्रिकेट असोसिएशन क्रिकेटप्रेमींच्या पाठीशी नेहमीच उभे राहिले आहे आणि त्यांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळीसुद्धा त्याला अपवाद असणार नाही. शेवटच्या दोन दिवसांत कोणताही खेळ झाला नसल्याचे तिकिटांची रक्कम परत करणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे.’

https://twitter.com/Maha_Sports/status/1199269771096625154

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---