पुणे| पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत केडन्स क्रिकेट अकादमी व अँबिशियस क्रिकेट अकादमी या संघानी अनुक्रमे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी व डेक्कन जिमखाना या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
येवलेवाडीच्या ब्रिलियंट्स स्पोर्ट्स अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत फिरकी गोलंदाज दिग्विजय पाटील(4-28) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केडन्सच्या दिग्विजय पाटील(4-28), शुभम हरपाळे(2-39), आर्य जाधव(2-36), सिद्धेश वरघंटे(2-24)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 48.5षटकात सर्वबाद 187 धावावर कोसळला. यात शुभम नवले 51, सुरज गोंड 27, किरण मोरे 20, राहुल वारे नाबाद 20, कपिल गायकवाड 19 यांनी धावा केल्या. 187धावांचे आव्हान केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 43.2षटकात 5 गडयांच्या बदल्यात 188धावा करून पूर्ण केले. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे केडन्स संघ 12.2षटकात 3बाद 65धावा असा अडचणीत असताना अथर्व काळेने 42चेंडूत 36धावा व हर्षल काटेने 96चेंडूत 2चौकारासह नाबाद 56 धावा यांनी चौथ्या गड्यासाठी 65चेंडूत 47धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर अथर्व काळे बाद झाल्यावर हर्षलने सिद्धेश वरघंटे(नाबाद 34धावा)च्या साथीत पाचव्या गड्यासाठी 111 चेंडूत 73धावांची भागीदारी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
वीरांगना क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत सचिन भोसले(4-37) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 6 गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना केडन्स व अँबिशियस क्रिकेट अकादमी यांच्यात दि.4 नोव्हेंबर रोजी पूना क्लब मैदानावर होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 48.5षटकात सर्वबाद 187 धावा(शुभम नवले 51(67,8×4), सुरज गोंड 27(38), किरण मोरे 20, राहुल वारे नाबाद 20, कपिल गायकवाड 19, दिग्विजय पाटील 4-28, शुभम हरपाळे 2-39, आर्य जाधव 2-36, सिद्धेश वरघंटे 2-24) पराभूत वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 43.2षटकात 5बाद 188धावा(हर्षल काटे नाबाद 56(96,2×4), अथर्व काळे 36(42,2×4,1×6), सिद्धेश वरघंटे नाबाद 34(50,3×4,1×6), अथर्व धर्माधिकारी 23(37,3×4), हृषिकेश मोटकर 14, कपिल गायकवाड 2-35, राहुल वारे 1-38);सामनावीर-दिग्विजय पाटील;केडन्स संघ 5 गडी राखून विजयी;
डेक्कन जिमखाना: 48षटकात सर्वबाद 216धावा(अजय बोरुडे 69(91,5×4,3×6), अनिश 54(63,7×4,2×6), हर्ष सांघवी 24, अभिषेक ताटे 15, सचिन भोसले 4-37, रिषभ कारवा 3-21, तनय सांघवी 1-24) पराभूत वि.अँबिशियस क्रिकेट अकादमी: 30.5षटकात 4बाद 222धावा(ऋषिकेश बारणे 68(68,12×4,1×6), ओंकार खाटपे नाबाद 40(36,6×4,1×6), अनिकेत पोरवाल नाबाद 52(41,7×4,2×6), सिद्धांत दोषी 26(20), यश बोरामणी 1-15, धीरज फटांगरे 1-25, सोहम कुमठेकर 1-34);सामनावीर-सचिन भोसले; अँबिशियस क्रिकेट अकादमी संघ 6 गडी राखून विजयी.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बुमराहवर जास्त अवलंबून राहू नका’, मुरलीधरनचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला
बाबर आझमची विराट कोहलीला टक्कर! आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ‘या’ विक्रमाच्या यादीत साधली बरोबरी