सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना नुकताच मेलबर्न येथे खेळवला गेला. मात्र, या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे दोन प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत. एवढेच नव्हे तर एका खेळाडूची शस्त्रक्रिया देखील करावी लागणार, कारण त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. कॅमेरुन ग्रीन आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ही या दोन दुखापतग्रस्त गोलंदाजांची नावे आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीन (Cameron Green) आणि मिचेल स्टार्क (Mitchell Starc) दुखापतग्रस्त झाले. ग्रीनवर येत्या काळात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र, स्टार्कला बरे होण्यात वेळ लागणार आहे. हे दोन्ही खेळाडू येत्या काळात ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याच्या आधी फिट होऊ शकतात. परंतू याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दोघांच्या बोंटाना गंभीर दुखापत झाली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी 4 आठवडे लागतील. जर हे दोन्ही गोलंदाज भारताच्या दौऱ्याला मुकले तर भारतासाठी आनंदाची बातमी असणार आहे.
भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणे गरजेचे आहे. जर भारताने ऑस्ट्रेलियाला 4-0 किंवा 3-0ने पराभूत करत मालिका जिंकली तर भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपदद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणे नक्की होऊन जाईल. असे झाल्यास भारत दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामन्यात 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या दरम्यान खेळवला जाणार आहे आणि शेवटचा सामना 9 मार्च-13 मार्च यादरम्यान खेळवला जाईल. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाला भारताविरुद्ध 4 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे बापरे! आयसीसी ‘पुरूष वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ची नामांकने जाहीर, भारताचे…
यंदाही आयसीसी पुरस्कारासाठी स्मृतीला नामांकन! यावेळी मिळणार तगडे आव्हान