Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदाही आयसीसी पुरस्कारासाठी स्मृतीला नामांकन! यावेळी मिळणार तगडे आव्हान

December 29, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Smriti-Mandhana

Photo Courtesy: Twitter/BCCIWomen


क्रिकेटजगतात संपूर्ण वर्षभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात. तीन विश्वचषक 2022 या वर्षात खेळले‌ गेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ‌(आयसीसी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करणार आहे. त्यासाठी त्यांनी नामांकने जाहीर करण्यास सुरुवात केली. गुरुवारी (29 डिसेंबर) आयसीसीने टी20 क्रिकेटपटूंची नामांकने जाहीर केली. वर्षातील सर्वोत्तम महिला टी20 खेळाडू पुरस्कारासाठी भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिला नामांकन मिळाले आहे.

Presenting the nominees for the next #ICCAward 🤩

The line-up for the ICC Women's T20I Cricketer of the Year 👇

— ICC (@ICC) December 29, 2022

 

आयसीसीने 2022 च्या सर्वोत्तम महिला टी20 खेळाडूसाठी जाहीर केलेल्या नामांकनांमध्ये स्मृतीसह पाकिस्तानची अनुभवी खेळाडू निदा दार, ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू ताहिला मॅकग्रा व न्यूझीलंडची अनुभवी सोफी डिवाईन यांनाही नामांकन मिळाले आहे.

स्मृती ही भारतीय संघाची उपकर्णधार आहे. ‌‌ तिने 2022 या वर्षात 23 सामन्यांमध्ये पाच अर्धशतकांच्या मदतीने 594 धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत ती भारतासाठी सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज होती. यापूर्वी देखील स्मृतीने तीन वेळा आयसीसी पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.

स्मृतीला हा पुरस्कार मिळवण्यासाठी तीन अष्टपैलू खेळाडूंशी झुंजावे लागणार आहे. पाकिस्तानची अष्टपैलू निदा दारने या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करताना 16 सामन्यात 396 धावा आणि 15 बळीही मिळवले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या न्यूझीलंडच्या सोफी डिवाईन हिनेदेखील या वर्षात चांगली कामगिरी करताना 389 धावा आणि 13 बळी मिळवलेले. ऑस्ट्रेलियाची उदयोन्मुख अष्टपैलू ताहिला मॅकग्रा देखील पहिल्यांदाच या पुरस्कारासाठी नामांकित झाली आहे. 16 सामन्यात 435 धावा व 13 बळी तिच्या नावे आहेत.

पुरुष गटात यावेळी भारताचा सूर्यकुमार यादव, ‌‌‌‌‌‌झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान व इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन हे नामांकित आहेत.

(Smriti Mandhana Nominated For ICC Womens T20 Player Of The Year 2022)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध भारत करणार नव्या वर्षाचे स्वागत! जाणून घ्या मालिकेचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
सूर्यासाठी वर्षाचा शेवट गोड! भारताच्या टी20 उपकर्णधार पदानंतर मिळाले आयसीसी पुरस्काराचे नामांकन


Next Post
Ishan-Kishan-And-Virat-Kohli

अरे बापरे! आयसीसी 'पुरूष वनडे क्रिकेटर ऑफ द इयर'ची नामांकने जाहीर, भारताचे...

Photo Courtesy: Twitter/Blackcaps

क्लासिक केन! विलियम्सनच्या नाबाद द्विशतकाने पाकिस्तान बॅकफूटवर; कराची कसोटीला निर्णायक वळण

Cameron Green Australia

भारतासाठी आनंदाची बातमी! डब्ल्यूटीसीमध्ये जाण्याचा मार्ग आता सोपा, ऑस्ट्रेलियाचे 'हे' दोन शिलेदार जखमी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143