जगातील सर्वात मोठी टी20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल 2023च्या हंगामासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. आयपीएलचा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोचीमध्ये होणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हादेखील सामील आहे, त्याच्यावर सर्व संघांच्या नजरा असतील. आता त्याने स्वतः याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे.
सध्या 23 वर्षीय ग्रीनकडे ऑस्ट्रेलियाचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. कोणत्याही क्रमांकावर आक्रमक फटकेबाजीसह उपयुक्त मध्यमगती गोलंदाजी तो करतो. त्याने भारत दौऱ्यावर डेविड वॉर्नर याच्या अनुपस्थितीत डावाची सुरुवात करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने या दौऱ्यावर अर्धशतक झळकावले होते. तसेच, 214.54च्या स्ट्राईक रेटने आणि 39.22च्या सरासरीने धावा चोपल्या होत्या. तेव्हापासूनच तो आयपीएलमध्ये सहभागी होणार का याबाबत चर्चा सुरू होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने देखील आपण त्याला आयपीएलमध्ये खेळण्यापासून रोखणार नसल्याचे म्हटलेले. त्यानंतर आता स्वतः त्याने आपण आयपीएल लिलावात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला,
“होय मी आयपीएल लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे. ही एक मोठी संधी असेल. ऑस्ट्रेलियातील अनेक खेळाडूंकडून याबाबत मी ऐकले आहे. ते आयपीएलमधील आपले अनुभव सांगत असतात. त्यांच्या बोलण्यातून जाणवते की, ही स्पर्धा किती मोठी आहे.”
ग्रीन हा अष्टपैलू असल्याने आयपीएल लिलावात त्याला मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स व दिल्ली कॅपिटल्स हे मोठी रक्कम शिल्लक असलेले संघ त्याच्यावर बोली लावताना दिसतील.
(Cameron Green Confirmed His IPL 2023 Auction Registration)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! ऋतुराज गायकवाडचा नाबाद द्विशतकी धमाका
वनडे विश्वचषक 2023साठी भारत, अफगाणिस्तानबरोबर ‘हे’ सहा संघ पात्र; दोन चॅम्पियन्स संघाना करावे लागणार श्रम






