भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 399 धावांचा डोंगर उभा केला. भारतासाठी शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांच्या तुफानी शतके, तर केएल राहुल व सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके साजरी केली. सूर्यकुमार यादव याने आपल्या खेळी दरम्यान इंग्लंडचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनवर चांगलाच हल्ला चढवला. त्यानंतर आता त्यांचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
भारताने आपला चौथा बळी गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) खेळपट्टीवर आला. सूर्यकुमाने अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रामक फलंदाजीला सुरुवात केली. 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने त्याने 24 चेंडूत अर्धशतक केले. यादरम्यान 44 व्या षटकात सूर्याने कॅमरून ग्रीन याला सलग चार षटकार मारले. षटकातील पहिल्या चार चेंडूत चार षटकार मारल्यानंतर सूर्यकुमार आणि केएल राहुल यांनी शेवटच्या दोन चेंडूंमध्ये प्रत्येकी एक-एक धाव घेतली. या षटकात भारतीय संघाला 26 धावा मिळाल्या. सूर्यकुमारच्या या चार षटकारांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. असे असतानाच सूर्यकुमार व ग्रीन यांचा आयपीएल दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.
Cameron Green during the IPL:
"If you're bad, Sky is my dad". https://t.co/mu2yKHUuch
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 24, 2023
या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू लीप रीडिंग हा खेळ खेळताना दिसत आहेत. त्यावेळी ग्रीन याच्यावर बारी आल्यानंतर त्याने ‘इफ यु आर बॅड, स्काय इज माय डॅड’ असे उद्गार काढले. हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सूर्य कुमारने या सामन्यात आपल्या फलंदाजीचे रौद्र रुप दाखवले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 37 चेंडूंवर 72 धावा कुटल्या. यामध्ये प्रत्येकी सहा चौकार व सहा षटकारांचा समावेश होता.
(Cameron Green Old Video Viral He Said Sky Is My Dad)
महत्वाच्या बातम्या –
इंदोरमध्ये टीम इंडियाकडून धावांची बरसात! ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचे लक्ष
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद