ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमरून ग्रीन हा नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महाग खेळाडू ठरला. त्याला मुंबई इंडियन्सने 2023च्या लिलावात 17.50 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याच्यासाठी मागील 4-5 दिवस चढउताराचे ठरत आहे. ऑस्ट्रेलिया सध्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळत आहे. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात ग्रीनने 5 विकेट्स घेताना अर्धशतकी खेळीही केली, मात्र त्याला दुखापत झाल्याने तो तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे.
कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. जी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यामुळे आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावसंख्येवरच संपुष्टात आला. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 177 चेंडूत 5 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 51 धावा केल्या. यामुळे तो एकप्रकारे बॉक्सिंग डे चा (26 डिसेंबरला खेळली जाणारी कसोटी) सुपरस्टारच ठरला आहे.
अष्टपैलू कामगिरी केली मात्र त्याच कसोटीत ग्रीनला फलंदाजी करताना दुखापत झाली. त्याला फलंदाजीवेळी एन्रिच नॉर्कियाचा चेंडू हाताच्या बोटाला लागला. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या या दुसऱ्या कसोटीत तो दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करणार नाही. यामुळे तो मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीलाही मुकणार आहे. हा कसोटी सामना 4 जानेवारीपासून सिडनी येथे खेळला जाणार आहे.
ग्रीनच्या संघात नसण्याने ऑस्ट्रेलियाच्या डोकदुखीत वाढ झाली आहे. कारण मिशेल स्टार्क आधीच क्षेत्ररक्षण करताना हाताच्या दुखापतमुळे त्रस्त आहे. आता ग्रीनची त्यात भर पडली आहे. दुसऱ्या कसोटीत द्विशतकी खेळी करणारा डेविड वॉर्नर यालाही थकवा आणि क्रॅम्पमुळे मैदान सोडावे लागले होते.
ग्रीनसाठी आयपीएल 2023च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघाने बोली लावली. मात्र, यामध्ये मुंबईला यश आले. दुसरीकडे, इंग्लंड संघाचा अष्टपैलू सॅम करन (Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्स संघाने 18.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. Cameron Green out of Sydney Test with injured finger vs south africa
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेश दौऱ्यावरुन परतताना भारतीय खेळाडूचे हरवले सामान, एअरलाईन्सकडेे मागितला जाब
2022मध्ये 200 शतके! क्रिकेटच्या इतिहासात यावर्षी रचला गेला बलाढ्य विक्रम, तुटले सर्व रेकॉर्ड्स