आयपीएल 2023 हंगाम सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने शुक्रवारी (23 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला होता. लिलावात भारतीय आणि दिवेशातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. कोचीमध्ये पार पडलेल्या या लिलावात खेळाडूंवर कोट्यावधी रुपये खर्च केले गेले. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने त्याला 17.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले असून ही रक्कम ऐकून त्याला स्वतःला देखील सुरुवातीला विश्वास बसला नव्हता.
भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 पूर्वी मायदेशात ऑस्ट्रेलियासोबत टी-20 मालिका खेळली. या ऑस्ट्रेलियन संघात कॅमरून ग्रीन (Cameron Green) सामील होता आणि त्याने हा दौरा गाजवला देखील. ग्रीनने पहिल्या टी-20 सामन्यात 30 चेंडूत 61 धावा केल्या होत्या. तर मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 21 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या होत्या. भारतात केलेल्या हे प्रदर्शन ग्रीनला आयपीएल 2023 च्या लिलावात कामी आले. तो सॅम करन (18.50 कोटी) नंतर दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबईने त्याच्यावर 17.50 कोटी रुपयांची शेवटची बोली लावल्यानंतर त्याने स्वतःची अवस्था काय झाली होती, याविषयी माहिती दिली.
माध्यमांशी बोलताना कॅमरून ग्रीन म्हणाला की, “जे काही झाले, ते पाहून मी स्वतःला चिमटा काढत होतो. स्वतःला आयपीएल लिलावात पाहणे, म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. मला विश्वस बसत नाहीये, मी त्यावेळी किती जास्त चिंतेत होते. जेव्हा शेवटची बोली निश्चित केली गेली, तेव्हा मी थरथर कापत होतो. मी नेमहीमच आयपीएलचा चाहता राहिलो आहे आणि यात खेळणे खरोखर चांगला अनुभव असेल. मुंबई इंडियन्स आघाडीचा संघ आहे आणि त्यांच्या ताफ्यात सामील होण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही.”
कॅमरून ग्रीन याने लिलावासाठी 2 कोटी ही बेस प्राईज ठेवली होती. त्याच्या नावावर सर्वात पहिली बोली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने लावली आणि नंतर मुंबई इंडियन्सने देखील पुढाकार घेतला. ही रक्कम पाहता – पाहता 7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. अशातच ग्रीनला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सनेही इच्छा दाखवली. मुंबई आणि दिल्ली संघात ग्रीनला खरेदी करण्यासाटी संघर्ष पाहायला मिळाला. परिणामी बोली 17.50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मुंबई संघ मागच्या मोठ्या काळापासून ग्रीनला खरेदी करण्यासाठी इच्छुक होता. अखेरी शुक्रवारी मुंबईच्या प्रयत्नांना यश आले. ग्रीनला खरेदी केल्यानंतर फ्रँचायझीचे मालक आकाश अंबानी देखील आनंदात पाहायला मिळाले. आकाश अंबानी आणि संघ व्यवस्थापनातील इतर सदस्यांचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे. (Cameron Green was in disbelief as Mumbai Indians bought him for Rs 17.50 crore.)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू, पण चर्चा फक्त त्याच्या गर्लफ्रेंडचीच; लव्हलाईफबद्दल वाचाच
लिलावात सर्वाधिक रक्कम घेऊन उतरलेल्या हैद्राबादने ‘या’ तिघांवरच उधळले 26 कोटी, पाहा संपूर्ण संघ