---Advertisement---

मंकडिंग क्विन…! पदार्पणाच्या सामन्यात १६ वर्षीय क्रिकेटरने मंकडिंग पद्धतीने ४ फलंदाजांना धाडले तंबूत

On: सोमवार, सप्टेंबर 13, 2021 2:57 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये मंकडिंगने एखाद्या फलंदाजाला बाद करणे नियमांप्रमाणे योग्य आहे. मात्र, जेंटलमन क्रिकेटमध्ये याला योग्य मानले जात नाही. टी२० विश्वचषकासाठीच्या क्वालिफायर सामन्यामध्ये कॅमरूनची १६ वर्षीय महिला गोलंदाज मेवा डाउमा हिने तिच्या पदार्पणाच्या सामन्यात मंकडिंग पद्धतीने ४ खेळाडूंना बाद केले आहे. मात्र तिच्या कॅमरून संघाचा मोठ्या फरकाने पराभव झाला.

हा सामना कॅमरून विरुद्ध युगांडा असा होता. युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कॅमरून संघाला १९० धावांचे मोठे आव्हान दिले. कॅमरूनची गोलंदाज मेवा डाउमा हिने केविन एविनो (३४), रिता मुसामली (५९), नाकीसुई (२१) आणि जेनत बबाजी (५) यांना मंकडिंग बाद केले. मेवा डाउमा हिचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असून तिने गोलंदाजी करताना ३२ धावा देत एक विकेट घेतला.

कॅमरूनच्या सात खेळाडू शून्य धावांवर बाद
युगांडाने कॅमरून संघाला या सामन्यात १९१ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. कॅमरूनचा महिला संघ १४.३ षटकात अवघ्या ३५ धावांवर स्वस्तात गुंडाळला गेला. त्यांच्या संघातील १० खेळाडू दोन आकडी धावाही करू शकले नाहीत आणि यापैकी ७ खेळाडू शून्य धावांवर बाद झाल्या. मदालिना सिसाकोने सर्वाधिक १७ धावा केल्या. मेवा डाउमाने एक धाव केली. युगांडा संघातील काॅनी अवेकीने ४ षटकात ४ धावा देत कॅमरूनचे ३ विकेट्स घेतले. अशाप्रकारे कॅमरूनच्या महिला संघाला त्यांच्या या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागाला आहे.

https://twitter.com/_hypocaust/status/1437129526455283712?s=20

मंकडिंग म्हणजे काय?
मंकडिंगमध्ये नाॅन स्ट्राइक एंडचा फलंदाज, गोलंदाजाने चेंडू हातातून सोडायच्या आधी धावपट्टीवर धावायला सुरुवात करतो आणि गोलंदाज चेंडू फेकण्याऐवजी फलंदाजाला धावबाद करतो.

मंकडिंग हा शब्द भारतीय खेळाडू वीनू मंकड यांच्या नावावरून तयार झाला आहे. त्यांनी १९४७-४८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बिल ब्राउन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा या पद्धतीने बाद केले आहे. त्यावेळी माध्यामांनी या प्रकारणावरून त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. पण क्रिकेटमध्ये असा नियम असल्यामुळे खेळाडूला बाद मानले जाते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये  १८३५ मध्ये पहिल्यांदा खेळाडू मंकडिंग बाद झाला होता. ससेक्ससोबत थाॅमस बाॅर्कर यांनी नाॅटिंघमशायर संघाच्या जाॅर्ज बेगंट यांना या मंकडिंग प्रकाराने बाद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

युएई टप्पा चाहत्यांसाठी ठरणार पर्वणी, प्लेऑफ गाठण्यासाठी ‘हे’ संघ लावणार पूर्ण जोर; पाहा सद्यस्थिती

हाच कर्णधार हवा! नेतृत्व करताना रोहितची अफलातून आकडेवारी, वाचा सविस्तर

युएई टप्प्यात ‘हे’ समालोचक आयपीएल सामन्यांमध्ये आणणार आणखी रंगत, भारतीय दिग्गजांची भरमार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---