---Advertisement---

कॅमरॉन ग्रीनने चित्त्याच्या चपळाईने एकहाती पकडला रिषभ पंतचा भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

On: रविवार, जानेवारी 17, 2021 10:50 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना चालू आहे. या सामन्याचा आज (१७ जानेवारी) तिसरा दिवस चालू असून भारतीय संघाने दुसऱ्या सत्राखेर ६ बाद २५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमरॉन ग्रीन याने भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा अप्रतिम झेल पकडला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाच्या पहिल्या डावातील ३७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर २० षटकांच्या आतच बाद झाले. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनीही लवकरच आपल्या विकेट गमावल्या. पुढे पंत खालच्या फळीत फलंदाजीला येत संघाचा डाव सावरेल, अशी सर्वांना अपेक्षा होती.

पंतने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत डावातील ६६व्या षटकापर्यंत २६ चेंडूत २१ धावा केल्या. त्यापुढील षटकात पंतची विकेट काढण्याच्या हेतूने कर्णधार टीम पेनने वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड याला गोलंदाजीसाठी पाठवले. हेजलवुडच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पंतने मैदानाच्या मागील बाजूने (गल्ली) फटकार मारला. परंतु आधीपासूनच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्रीन तिथे उभा होता.

ग्रीनने पंतचा चेंडू आपल्या दिशेने येताच वेगाने डाव्या बाजूला डाइव्ह मारत एका हाताने अप्रतिम झेल पकडला. त्यामुळे २९ चेंडूत अवघ्या २३ धावा करत पंत बाद झाला. विशेष म्हणजे, गली या क्षेत्ररक्षणाच्या जागेवर चांगले क्षेत्ररक्षण करता येत नसल्याचे ग्रीनने एका मुलाखतीत सांगितले होते. परंतु आता त्याच जागी ग्रीनने पंतचा शानदार झेल पकडला आहे.

पंतच्या रुपात भारतीय संघाने सहावी विकेट गमावली. आता पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर फलंदाजी करत आहेत. वॉशिंग्टनने नाबाद ३८ धावा केल्या आहेत. तर शार्दुल ३३ धावांवर नाबाद खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : भारताचा अर्धा संघ तंबुत; भारताच्या ६५ षटकात ५ बाद १७५ धावा

बंदर क्या जाने अद्रक का स्वाद..! सनग्लासेसवरुन पंतची थट्टा करणाऱ्या समालोचकांना चाहत्यांनी केले ट्रोल

बापरे! ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या ४ वर्षात चेतेश्वर पुजाराने खेळलेत ‘एवढे’ चेंडू; बाकी खेळाडू जवळपासही नाहीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---