---Advertisement---

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला शुक्रवारी (९ एप्रिल) धमाकेदार सुरुवात झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर दोन गड्यांनी मात करत विजयी सलामी दिली. त्यानंतर, आज(१० एप्रिल) दुसर्‍या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येतील. त्याचबरोबर, एमएस धोनी मागील आयपीएल हंगामावेळी दिलेली एक वचन पूर्ण करेल का, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

चेन्नई-दिल्ली ठाकणार एकमेकांसमोर उभे
आयपीएलच्या १४ व्या  हंगामातील दुसऱ्या सामन्यात तीन वेळचा आयपीएल विजेता संघ चेन्नई सुपर किंग्स व मागील वर्षीचा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येथील. चेन्नईचे नेतृत्व सर्वात अनुभवी एमएस धोनी तर, दिल्लीचे नेतृत्व युवा रिषभ पंत करेल. पंत प्रथमच आयपीएलमध्ये नेतृत्वाचा भार वाहताना दिसेल.

एकीकडे चेन्नईचा संघात धोनीसह सुरेश रैना, रवींद्र जडेजा, इम्रान ताहीर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डू प्लेसीस, शार्दुल ठाकुर यांसारखे आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळताना दिसतील. तर दुसरीकडे, रिषभच्या दिमतीला अनुभवी शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ व अजिंक्य रहाणे यांच्यासोबत पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, ईशांत शर्मा असतील. दिल्लीसाठी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा व एन्रिच नॉर्किए हे विलगीकरणात असल्याने उपलब्ध असणार नाहीत.

धोनी करणार वचनपूर्ती
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी व संपूर्ण चेन्नई सुपर किंग्स संघ चाहत्यांना मागील आयपीएल हंगामावेळी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी खेळताना दिसेल. मागील आयपीएलमधील अखेरच्या सामन्यानंतर धोनी चाहत्यांना संदेश देत म्हटला होता,
“आम्ही पुढील हंगामात जोरदार पुनरागमन करू. आम्ही त्यासाठीच ओळखले जातो.”

https://twitter.com/SivaHarsha_1/status/1380591441085308928

चेन्नई सुपर किंग्ससाठी मागील हंगाम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब हंगाम ठरला होता. संघ प्रथमच प्ले ऑफसाठी पात्र न ठरता सातव्या स्थानावर राहिला होता. त्यानंतर, चेन्नई संघ व धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---