---Advertisement---

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

On: शनिवार, एप्रिल 10, 2021 3:23 PM
---Advertisement---

भारतात गेल्या दिडवर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या महामारीच्या विळख्यात आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूदेखील अडकले आहेत. त्यातच कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिलपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बेंगलोर सामन्याने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा शुभारंभ झाला आहे.

या हंगामाची सुरुवात होण्यापुर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने प्रेक्षकांविना केवळ मॅच ऑफिशियल्सच्या उपस्थितीत आयपीएल सामने खेळवण्याचे निर्देश दिले होते. परंतु आयपीएल २०२१ चा पहिला सामना पाहण्यासाठी आलेल्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनीच नियमांचे पालन न केल्याने चाहत्यांना त्यांना ट्रोल केले आहे.

त्याचे झाले असे की, मुंबई-बेंगलोर यांच्यातील सलामीच्या सामन्यास बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी उपस्थिती नोंदवली होती. परंतु सामना पाहतेवेळी दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क लावलेला नव्हता. आयपीएलची सुरुवात होण्यापुर्वी आणि झाल्यानंतर कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आवाहन देणारे बीसीसीआयचे अधिकारीच मास्क घालत नसल्याचे सांगत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनेकांनी सौरव गांगुली आणि जय शहा यांचे फोटो शेअर करत त्यांना ट्रोल केले आहे.

https://twitter.com/Arun_aka_roo/status/1380550648161169410?s=20

https://twitter.com/Sridhar_thiru/status/1380543832664629257?s=20

https://twitter.com/farzan_faisal/status/1380556160344809476?s=20

दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे मुंबई इंडियन्स कडून प्रथम फलंदाजी करताना ख्रिस लिनने सर्वाधिक ४९ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ३१ धावा आणि इशान किशननेही २८ धावांचे योगदान दिले. त्यामुळे मुंबईने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. बेंगलोरकडून गोलंदाजी करताना हर्षल पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात बेंगलोरने ८ विकेट्स गमावत मुंबईचे आव्हान पूर्ण केले आणि २ विकेट्सने सामना खिशात घातला. बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ४९ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने ३३ आणि ग्लेन मॅक्सवेलने ३९ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

कृणाल पंड्याच्या ‘सुपर थ्रो’ने आरसीबी चाहत्यांचा रोखला होता श्वास; पाहा डिविलियर्सला धावबाद केलेला तो क्षण

IPL 2021: ‘त्या’ तीन चुका, ज्यामुळे रोहितची पलटण आरसीबीच्या हातून झाली चारीमुंड्या चीत!

जबराट! चक्क हातावर आरती ठेवत चाहत्याने केली विराटची पुजा, पाहा झक्कास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---