शुक्रवारी (9 एप्रिल) रोजी आयपीएलच्या 14 व्या सत्राला सुरूवात झाली असून चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला.
सामन्यातील शेवटच्या चेंडूवर या सामन्याचा विजय निश्चित झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने आरसीबी समोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 20 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर 8 गड्यांच्या मोबदल्यात आरसीबीने विजय मिळवला. यामध्ये आरसीबीकडून एबी डिविलियर्सने 48 धावांची उत्कृष्ट खेळी केली.
परंतु सामन्यातील शेवटच्या षटकात ज्याप्रकारे तो धावबाद झाला, ते पाहता आरसीबीच्या चाहत्यांचा श्वास रोखला गेला. पण अखेर आरसीबीने विजय मिळवत यंदाच्या सत्रात दमदार पदार्पण करण्यास यश मिळविले.
M01: MI vs RCB – AB de Villiers Wicket https://t.co/91QJU1GnZI via @ipl
— Shubham (@Shubham91216059) April 9, 2021
सामन्याच्या शेवटच्या षटकात बंगळुरूला विजय मिळवण्यासाठी केवळ सात धावांची आवश्यकता असताना खेळपट्टीवर वर एबी डिव्हिलियर्स होता. परंतु या षटकात दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. मुंबई संघातील कृणाल पांड्याने त्याच्या सुपरमॅन थ्रोने डिव्हिलियर्सला बाद केले. त्यावेळी असे वाटले की कदाचित मुंबई येथून सामन्यात पुनरागमन करेल. परंतु अखेर आरसीबी संघाने 2 गडी राखून हा सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2021: ‘त्या’ तीन चुका, ज्यामुळे रोहितची पलटण आरसीबीच्या हातून झाली चारीमुंड्या चीत!
जबराट! चक्क हातावर आरती ठेवत चाहत्याने केली विराटची पुजा, पाहा झक्कास व्हिडिओ
फॅन असावा तर असा! बेंगलोरविरुद्ध फलंदाजीला उतरलेल्या रोहितची चाहत्याने केली आरती, पाहा भारी व्हिडिओ