आयपीएल स्पर्धेचा 18 वा हंगाम सध्या सुरू आहे. पॉईंट्स टेबल मध्ये टॉप 4 मध्ये असे 3 संघ आहेत, ज्यांनी अजूनही आयपीएलचा एकही किताब जिंकलेला नाही. तसेच 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबई इंडियन्सची सध्या वाईट अवस्था आहे. चेन्नई सुद्धा अशाच प्रकारे खेळातील वाईट प्रदर्शनातून जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स बद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी 6 सामने खेळले आहेत. त्यातील फक्त 2 सामने जिंकले आहेत. चला तर जाणून घ्या आता मुंबई इंडियन्सचे किती सामने राहिले आहेत आणि त्यातील त्यांना किती सामने जिंकावे लागतील आणि तेव्हाच ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील.
मुंबई इंडियन्सने त्यांची स्पर्धेमध्ये सुरुवात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामन्याने केली होती. त्यामध्ये चेन्नईने मुंबईला 4 विकेट्सने पराभूत केले होते. हार्दिकच्या ठिकाणी या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव कर्णधार होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात हार्दिक परत आला पण, मुंबई संघ या सामन्यात गुजरातकडून पराभूत झाला. मुंबईला पहिला विजय त्यांच्या तिसऱ्या सामन्यात भेटला. जेव्हा संघाने केकेआर संघाचा 8 विकेट्सने घरेलू मैदानावर पराभव केला. यानंतर पुन्हा मुंबई त्यांच्या घरेलू मैदानावर आरसीबीकडून पराभूत झाली. तसेच मागच्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरेलू मैदानात मात दिली.
मुंबई इंडियन्सचे पुढच्या सामन्यांचे वेळापत्रक
17 एप्रिल- मुंबई विरुद्ध हैदराबाद (मुंबई)
20 एप्रिल- मुंबई विरुद्ध चेन्नई (मुंबई)
23 एप्रिल- हैदराबाद विरुद्ध मुंबई (हैदराबाद)
27 एप्रिल- मुंबई विरुद्ध लखनऊ (मुंबई)
1 मे- राजस्थान विरुद्ध मुंबई (जयपुर)
6 मे- मुंबई विरुद्ध गुजरात (मुंबई)
11 मे- पंजाब विरुद्ध मुंबई (चंडीगढ़)
15 मे- मुंबई विरुद्ध दिल्ली (मुंबई)
गुरुवार रोजी होणारा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद 17 एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना धरून मुंबई इंडियन्स संघाचे अजून 8 सामने राहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्याकडे अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे, पण ती किती जाणून घ्या.
मुंबई इंडियन्स संघाचे 8 सामने उरले आहेत आणि आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यानंतर त्यांचे 4 गुण आहेत. मुंबईला जर प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना कमीत कमी 7 सामने जिंकावे लागतील. 6 सामने जिंकल्यानंतर त्यांचे 16 गुण होऊ शकतात, पण तेव्हा बाकीच्या संघांचे कसे प्रदर्शन राहील बाकी गोष्टी यावर सुद्धा निर्भर करतील. पण जर 8 मधील 3 सामने मुंबई पराभूत झाली तर प्लेऑफमध्ये पोहोचणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होईल.






