---Advertisement---

‘मी कोण आहे, त्याच्याशी माझी तुलना करणारा’, धोनीबद्दल केएल राहुलची हृदयास भिडणारी प्रतिक्रिया

On: गुरूवार, ऑगस्ट 18, 2022 9:42 AM
MS-Dhoni-KL-Rahul
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल याच्यासाठी झिम्बाब्वे दौरा फार महत्त्वपूर्ण असेल. दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेला राहुलकडे या मालिकेत एक फलंदाज आणि कर्णधार, दोन्ही रूपात छाप सोडण्याची संधी असेल. नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत राहुल या दौऱ्यात भारतीय संघाची कमान सांभाळेल. भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (१८ ऑगस्ट) हरारे येथे रंगेल. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत राहुलने (KL Rahul) कर्णधार म्हणून त्याचे विचार काय आहेत?, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या (India vs Zimbabwe) पहिल्या वनडे सामन्यापूर्वी पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेल राहुलला विचारले गेले की, त्याने दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी (MS Dhoni) किंवा रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला आहे का? यावर उत्तर देताना राहुल (KL Rahul On MS Dhoni) म्हणाला की, “मी धोनीच्या मार्गावर चालून अजून वेगळा काही बनू शकत नाही. असे केल्यास मी स्वत:साठी, संघासाठी किंवा खेळाप्रती निष्पक्ष राहू शकणार नाही. मी प्रयत्न करत असतो की, मी तसेच राहावे, जसा मी आहे आणि इतर खेळाडूंना तसे राहू द्यावे जसे त्यांचा राहायचे आहे.” 

“मी कोण आहे या लोकांसोबत (धोनी, रोहित) माझी तुलना करणारा. माझी त्यांच्याशी तुलनाही नाही होऊ शकत. त्यांनी देशासाठी जे केले आहे, त्याचे महत्त्व खूप जास्त आहे. मला नाही वाटत की, कोणत्याच खेळाडूची धोनीसोबत तुलना केली जाऊ शकते”, असेही राहुलने पुढे म्हटले आहे.

दरम्यान राहुलची (KL Rahul) भारताच्या वनडे संघाचे नेतृत्त्व करतानाचे आकडे निराशादायी राहिले आहेत. त्याने जानेवारीत पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी राहुलला कर्णधार बनवले गेले होते. परंतु या मालिकेत भारतीय संघाचे फार हाल झाले होते. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत भारताला ३-० ने पराभूत केले होते अर्थातच व्हाईटवॉश दिला होता.

इतकेच नव्हे तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही त्याला कर्णधार बनवले गेले होते. मात्र हा सामनाही भारतीय संघाने गमावला होता. अशात आता तो झिम्बाब्वेविरुद्ध कशी कामगिरी करतो?, हे पाहावे लागेल.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडे ५ सलामीवीर, दोघांची जागा निश्चित; एकटा संपूर्ण मालिकेत बसणार बाहेर?

भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतात झिम्बाब्वेचे ‘हे’ दोघे खेळाडू, एकट्याने ठोकलीत सलग २ शतके

ZIMvsIND: राहुलने गाजवलेलं झिम्बाब्वेविरुद्धच पदार्पण, आता कॅप्टन म्हणून मिळवणार पहिला विजय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---