पराभूत झाल्यानंतर कर्णधार कोहली या लोकांवर भडकला

वेलिंग्टन । आज(24 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात  बेसिन रिझर्व (Basin Reserve) स्टेडियमवर पहिला कसोटी सामना (1st Test Match) पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 10 विकेट्सने विजय (Won By 10 Wickets) मिळवला आहे. त्याचबरोबर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर विराटने मान्य केले की, यजमान संघाने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला प्रत्येक डावात पराभूत केले आहे.

“आम्हाला माहिती आहे की, आम्ही चांगली कामगिरी केली नाही. पंरतु काही लोक पराभवासारख्या छोट्या गोष्टीलाही मोठे रूप देत आहेत. तेव्हा मी यामध्ये काहीही करू शकत नाही. कारण आम्ही असा विचार करत नाही,” असे कसोटी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला.

“काही लोकांसाठी सामन्यात पराभव म्हणजे जगाचा अंत असू शकतो, परंतु असे काही नाहीये. आमच्यासाठी हा क्रिकेटचा सामना होता ज्यामध्ये आम्ही पराभूत झालो. आम्ही यातून पुढे पाऊल टाकत जातो आणि मान उंच ठेवतो,” असे लोकांच्या मानसिकतेबद्दल बोलताना विराट म्हणाला.

“परदेशात जिंकण्यासाठीही आम्हाला चांगले खेळावे लागते. आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीही सोपे नसते. कारण इतर संघ येतात आणि तुम्हाला पराभूत करतात. पंरतु तुम्ही याचा स्विकार करता आणि त्यामुळे एक संघ म्हणून तुम्ही परिपक्व होता,” असेही विराट यावेळी म्हणाला.

You might also like