---Advertisement---

दिल्लीतील अरुण जेटली आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबईकर रोहित शर्माचे नाव होणार हिट

On: शनिवार, नोव्हेंबर 2, 2019 2:23 PM
---Advertisement---

दिल्ली | भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) पहिला टी20 सामना उद्या (3 नोव्हेंबर) दिल्लीत (Delhi T20i) होणार आहे.  या सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा मुंबईकर रोहित शर्मा (Rohit Sharma) सांभाळत आहे. याच सामन्यात रोहितला एक मोठा पराक्रम करण्याची संधी आहे.

रोहितने या सामन्यात जर 50 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सर्वाधिक वेळा 50 किंवा अधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरणार आहे. रोहितने टी20 कारकिर्दीत 98 सामन्यांत 32.14च्या सरासरीने 2443 धावा केल्या आहेत. परंतु हे करताना त्याने 4 शतके आणि 17 अर्धशतके केली आहेत. यामुळे तब्बल 21 वेळा त्याने टी20 डावात 50 किंवा अधिक धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने 72 सामन्यात 22 वेळा 50 किंवा अधिक धावा केल्या आहेत. यामुळे या सामन्यात विराटचा हाच विक्रम मोडण्याची संधी रोहितला आहे. विराट व रोहित सोडून जगातील कोणत्याही खेळा़डूला असा कारनामा 16 पेक्षा जास्त वेळा करता आलेला नाही.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक 4 शतके करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. 22 वेळा 50 किंवा अधिक धावा (Most 50s in T20 International) करणाऱ्या विराटला मात्र आजपर्यंत एकही शतकी खेळी टी20मध्ये करता आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---