---Advertisement---

T20 World Cup 2026: ‘या’ संघाचा ऐतिहासिक पराक्रम! पहिल्यांदाच खेळणार टी20 वर्ल्ड कप

On: रविवार, जून 22, 2025 3:08 PM
t20 world cup trophy
---Advertisement---

ICC T20 World Cup 2026: आयसीसी टी20 विश्वचषक 2026 पुढच्या वर्षी खेळवला जाणार आहे. यावेळी या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहेत. विशेष बाब म्हणजे या वेळी टी20 विश्वचषकासाठी एक नवीन संघ पात्र ठरला आहे. कॅनडा. कॅनडा संघ प्रथमच टी20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. त्यांनी आपल्या घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करत विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. (Canada qualifies for T20 World Cup)

अमेरिकन क्वालिफायरमध्ये कॅनडाने बहामासचा पराभव करत पहिल्यांदाच टी20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. या सामन्यात कॅनडाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत बहामासला फक्त 57 धावांत गारद केलं. कॅनडाकडून कलीम सना आणि शिवम शर्मा यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर कॅनडाने हे लक्ष्य केवळ 5.3 षटकांत सहज पूर्ण केलं. दिलप्रीत बाजवाने 14 चेंडूंमध्ये नाबाद 36 धावा करत फलंदाजीत चमक दाखवली.

अमेरिकन क्वालिफायरमध्ये कॅनडाचा संपूर्ण प्रवास उत्कृष्ट राहिला. निकोलस किर्टनच्या नेतृत्वाखाली कॅनडाने क्षेत्रीय फायनल फेरीतील सर्व 5 सामने जिंकले. त्यांनी क्रमशः बरमूडा, केमन आयलंड्स आणि बहामास यांच्यावर प्रभावी विजय मिळवला.

ही दुसरी वेळ आहे जेव्हा कॅनडा संघ भारतात विश्वचषक खेळणार आहे. याआधी 2011 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकासाठी कॅनडाने पात्रता मिळवली होती. मात्र त्या स्पर्धेत त्यांचा काही खास प्रभाव पडला नव्हता, आणि त्यांनी 6 लीग सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकला होता.

आयसीसी टी20 विश्वचषक 2026 साठी एकूण 20 पैकी 13 संघ निश्चित झाले आहेत. त्यामध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडीज, युएसए, आयर्लंड आणि कॅनडा यांचा समावेश आहे. (T20 World Cup 2026 teams)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---