---Advertisement---

‘पाकिस्तानला आशिया कपचा भाग होताना पाहू शकत नाही’ सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले?

---Advertisement---

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान देशांमध्ये राजकीय तणाव निर्माण होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारत-पाकिस्तान मधील आशियाई क्रिकेट परिषद उध्वस्त होऊ शकते. भारत यावर्षी आशिया कप स्पर्धेसाठी श्रीलंका सोबत यजमान आहे. सध्या आशिया कप स्पर्धेची तारीख आणि ठिकाणे ठरलेली नाहीत. पण एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या कारणाने या वर्षी आशिया कप होणार नाही. तसेच दुसरीकडे भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पाकिस्तान विषयी मोठं वक्तव्य केलं आहे, जाणून घ्या ते काय म्हणाले?

सुनील गावस्कर म्हणाले जर आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तर पाकिस्तानला यामधून बाहेर काढलं पाहिजे.
सुनील गावस्करांचं म्हणणं आहे की, मागच्या महिन्यात काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आशिया कपमध्ये सहभागी होताना बघू शकत नाही. भारत-श्रीलंका यावर्षी स्पर्धेचे यजमान असतील, पण या हल्ल्यानंतर पाकिस्तानला स्पर्धेत भाग घेताना मी पाहू शकत नाही. तसेच हे खूप संशयास्पद आहे.

स्पोर्ट्स टुडेशी बोलताना गावस्कर म्हणाले, बीसीसीआयची कारवाई अगदी भारत सरकार सारखीच असेल. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये वातावरण शांत झालं नाही, तर पाकिस्तान संघ स्पर्धेचा हिस्सा नाही बनू शकणार.तसेच ते असेही म्हणाले की, बीसीसीआय नेहमी तेच करत आली आहे, जे भारत सरकारकडून त्यांना करण्यासाठी सांगितले जाते. त्यामुळे मला नाही वाटत की, आशिया कपच्या स्पर्धेमध्ये कोणताही बदल होईल.

आशिया कप स्पर्धेचे यजमान भारत आणि श्रीलंका आहेत, त्यामुळे हे या गोष्टीवर निर्भर करते की गोष्टी बदलतात की नाही. जर गोष्टी बदलल्या नाहीत तर पाकिस्तानला या स्पर्धेत बघूच शकत नाही. ज्याचे यजमान पद भारत आणि श्रीलंका सांभाळणार आहेत.

पुढे बोलताना गावस्करांनी हा देखील दावा केला की, आशियाई क्रिकेट परिषद भंग होऊ शकते. ते खास करून म्हणाले, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी संघटनेच्या अध्यक्ष रूपामध्ये कार्यभार सांभाळल्यानंतर मला माहित नाही की हे कसे होईल. आशिया कपमध्ये तीन किंवा चार देशांमध्ये ही स्पर्धा होईल. ज्यामध्ये हॉंगकॉंग, यूएई देशांना आमंत्रित केले जाऊ शकते. तसेच काही महिन्यांमध्ये या गोष्टी स्पष्ट होतील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---