---Advertisement---

बाबर आजमची चूक पाकिस्तानला भलतीच भोवली, विरोधी संघाला मिळाल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा

Shaheen Afridi & Babar Azam
---Advertisement---

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याचाच धडाका सुरू आहे. त्याने संघाचे उत्तम नेतृत्व करताना वेस्ट इंडिज विरुद्ध धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र शुक्रवारी (१० जून) झालेल्या सामन्यात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. त्याच्याकडून चूक झाल्याने वेस्ट इंडिज संघाला पाच धावांचा फायदा झाला आहे.

झाले असे की, मुल्तान येथे सुुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात मोहम्मद नवाजने टाकलेल्या २९व्या षटकातील पहिला चेंडू अल्झारी जोसेफच्या बॅटची कड लागून स्क्वेयर लेगवर गेला. तेथे उभा अससेल्या खेळाडूने चेंडू बाबर आजमकडे फेकला होता. बाबरने हा चेंडू ग्लोव्ह्ज घालून झेलला, यामुळेच पंचांनी पेनाल्टी म्हणून वेस्ट इंडिज संघाला पाच धावा दिल्या.

क्रिकेटच्या २८.१ नियमानुसार, ‘यष्टीरक्षक सोडून क्षेत्ररक्षण करणाऱ्या बाकी कोणत्याच खेळाडूला ग्लोव्ह्ज किंवा पॅड घालण्याची परवानगी नाही. जर कोणत्या खेळाडूने असे केले तर विरोधी संघाला अतिरिक्त पाच धावा मिळतील.’

पाच धावाची पेनल्टी बसल्याचे कळताच बाबरला (Babar Azam) हसू फुटले होते. त्याने या सामन्यात ७७ धावा केल्या आहेत. क्रिकेटमध्ये अनेक नवीन विक्रम करणाऱ्या आणि मोडणाऱ्या या कर्णधाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर यष्टीरक्षण करण्याचा अनुभव नाही. त्याचे चुलत भाऊ म्हणजे अकमल बंधू (कामरान, उमर आणि अदनान) यांनी पाकिस्तानसाठी यष्टीरक्षकाची भुमिका पार पाडली आहे.

https://twitter.com/theobsessedbear/status/1535320295208361986?s=20&t=yvr7yGhY19yrj_vVH0aaBw

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तान संघाने ५० षटकात ८ विकेट्स गमावत २७५ धावसंख्या उभारली होती. सलामीवीर इमाम उल हक याने ७२ धावा केल्या आहेत. बाबर-इमाम या जोडीने चौथ्या वनडे सामन्यात १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याचा कारनामा केला आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ १५५ धावांवरच गारद झाला. मोहम्मद नवाजने १० षटकांमध्ये १९ धावा देत ४ विकेट्स पटकावल्या. त्याची ही कामगिरी विशेष ठरली आहे. हा सामना पाकिस्तानने १२० धावांनी जिंकला. यामुळे ते तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-०ने पुढे आहेत. याआधी त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्धची टी२० मालिका ३-० अशी जिंंकली आहे.

या मालिकेतील तिसरा वनडे सामना मुल्तान येथेच होणार असून तो रविवारी (१२ जून) खेळला जाणार आहे. हा सामना जिंकत मालिका ३-० अशी खिशात घालण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असणार आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाचा सामना-

क्रिकेटविश्वात कोणालाच न जमलेला विक्रम बाबर आजमने केलायं

‘मला विश्वास आहे!’ म्हणत पॉंटिंगने केली विराटची पाठराखण, स्वत:च्या कारकिर्दीचे दिले उदाहरण

गडी काय थांबना!, आयपीएल संपल्यानंतर अश्विन करतोय इंग्लंडविरुद्धच्या कसोटीची विशेष तयारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---