आधी भारत आणि नंतर झिम्बाब्वे या दोन देशांकडून पाकिस्तान संघाला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेपूर्वी प्रबळ दावेदार मानला जाणारा पाकिस्तान संघाला उतरती कळा लागली. गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) पर्थ येथे झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला 1 धावेने पराभूत केले. जवळपास पाकिस्तान संघ या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. झिम्बाब्वेने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला अपयश आले. पराभवानंतर कर्णधार बाबर आझम याची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. यादरम्यानचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.
या सामन्यात झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी झिम्बाब्वेने 8 विकेट्सच्या नुकसानावर 130 धावांचा छोटा डोंगर उभा केला होता. मात्र, हे सोपे आव्हानही पाकिस्तानला पार करता आले नाही. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाला 8 विकेट्स गमावत 129 धावाच करता आल्या. पाकिस्तानला शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज होती. ब्रॅड इव्हान्स याने टाकलेल्या चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याने लाँग ऑनच्या दिशेने शॉट मारला. तसेच, त्याने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न फसला.
पाकिस्तान संघाने दोन धावा घेतल्या असत्या, तर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. मात्र, झिम्बाब्वेच्या तगड्या खेळाडूंनी पाकिस्तानला ही संधी दिलीच नाही. क्षेत्ररक्षकाने चेंडू थेट यष्टीरक्षक चकाब्वाकडे फेकला. यावेळी त्याच्या हातातून चेंडू निसटला, पण त्याने शेवटी आफ्रिदीला बाद करून संघाला विजय मिळवून दिला.
https://www.instagram.com/p/CkOIrRzscd4/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
आफ्रिदीला धावबाद केल्यानंतर डगआऊटमध्ये बसलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) एकदम स्तब्ध दिसला. त्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बाबरने दोन्ही हात आपल्या तोंडावर ठेवल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचा हा या विश्वचषकातील सलग दुसरा पराभव आहे. झिम्बाब्वेपूर्वी भारतीय संघानेही पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले होते. आता पाकिस्तानला उपांत्य सामन्यात जागा मिळवायची असेल, तर त्यांना सुपर 12फेरीतील उर्वरित 3 सामने जिंकून इतर संघांच्या पराभवावर अवलंबून राहावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाद पेटला! ‘मिस्टर बीन’ने वादाला दिली फोडणी, झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींना भिडले पाकिस्तानी पंतप्रधान
नियमांना फाट्यावर मारत जिंकायला निघालेला पाकिस्तान, पण झिम्बाब्वेच्या सिकंदरने हाणून पाडला डाव





