सलग दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स संघाला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल 2023 स्पर्धेतील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा 9 धावांनी नजीकचा पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार वॉर्नर निराश झाला. यानंतर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली. त्याची प्रतिक्रिया सध्या क्रिकेटविश्वात चर्चेत आहे.
अरुण जेटली स्टेडिअम, दिल्ली या घरच्या मैदानावर खेळताना डेविड वॉर्नर याच्या संघाने नाणेफेक गमावत गोलंदाजी केली. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 197 धावा केल्या होत्या. यामध्ये दिल्ली या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकात 6 विकेट्स गमावत 188 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना हैदराबादने 9 धावांनी जिंकला.
वॉर्नरची प्रतिक्रिया
या पराभवानंतर वॉर्नर म्हणाला की, “आमच्या गोलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केले. मात्र, मिचेल मार्श याने शानदार खेळ दाखवला. अशाप्रकारे 9 धावांनी सामना गमावणे खूपच निराशाजनक आहे.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “सामना पुढे जाण्यासोबतच खेळपट्टी संथ होते. विशेषत: जेव्हा तुम्ही मधल्या षटकात विकेट गमावता, तेव्हा परिस्थिती कठीण होईल.”
अक्षर पटेलचे कौतुक
मात्र, वॉर्नरने यावेळी अक्षर पटेलचे कौतुक केले. तो म्हणाला की, अक्षर पटेल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वॉर्नर म्हणाला, “जर आमच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली असती, तर अक्षर पटेल मधल्या फळीत फिरकीपटूंविरुद्ध सामना जिंकून देऊ शकला असता. विशेषत: धावांचा पाठलाग करताना मधल्या षटकात आमच्या संघाने सातत्याने विकेट्स गमावले, ज्याचा आम्हाला फटका सहन करावा लागला.’
मिचेल मार्शचे अष्टपैलू प्रदर्शन
या सामन्यात हैदराबादच्या डावात आधी दिल्लीकडून मिचेल मार्श याने अफलातून गोलंदाजी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 27 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 39 चेंडूत 1 चौकार आणि 6 षटकारांसह 63 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दिल्लीकडून फलंदाजी करताना मार्शव्यतिरिक्त फिल सॉल्ट यानेही 35 चेंडूत 59 धावांचे योगदान दिले. त्याच्या या खेळीत 9 चौकारांचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त रिपल पटले याने 14 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या.
He might not have ended up on the winning side but Mitchell Marsh delivered a spirited all-round performance for @DelhiCapitals and received the Player of the Match award 👏🏻👏🏻#SRH register a 9-run win in Delhi 👌🏻👌🏻
Scorecard ▶️ https://t.co/iOYYyw2zca #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/MmSvKhhmWW
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना मयंक मार्कंडे याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, अकील होसेन, टी नटराजन आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीत उगवला हैदराबादच्या विजयाचा ‘सूर्य’, सलग तीन पराभवांनंतर मिळवला 9 धावांनी विजय
‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या 10 गोष्टी, एका क्लिकवर घ्या जाणून