आयपीएल 2024च्या शेवटच्या टप्प्यातील एलिमिनेटर सामना बुधवारी 22 मे रोजी खेळला गेला. हा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध राजस्थान राॅयल्स (RR) यांच्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहायला मिळाला. राजस्थाननं बंगळुरुचा 4 गडी राखून धुव्वा उडवला. राजस्थाननं नाणेफेक जिंकून आरसीबीला फलंदाजीसाठी पाचारण केलं. परंतु आरसीबीनं फलंदाजी करताना 8 गडी गमावून 172 धावांच आव्हान राजस्थान समोर ठेवलं. राजस्थाननं 6 गडी गमावून 19 ओव्हरमध्ये दिलेलं लक्ष्य गाठलं.
सामन्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस खूप निराश झाला होता. सामना गमावल्यानंतर तो म्हणाला, “जेव्हा आम्ही मेदान पाहिलं तेव्हा आम्हाला वाटलं की मैदानावरती खूप दव आहे. तेव्हा वाटल की आम्ही 20 धावा कमी बनवल्या. परंतु आमच्या संघानं जो संघर्ष केला, तो आमच्यासाठी खूप चांगला राहिला आहे. या विकेटवरती 180 धावांच आव्हान चांगल राहिलं असतं. सुरुवातीला चेंडू फिरत होता. परंतु इम्पॅक्ट खेळाडूच्या नवीन नियमासह या पिचवरती 172 धावा रोखणं खूप कठीण होत.”
डु प्लेसिस प्लेसिस म्हणाला “शेवटच्या 6 सामन्यात आम्ही जोरदार कमबॅक केला होता. परंतु आज आम्ही चांगले प्रदर्शन करु शकलो नाही. या सामन्यात संघातला कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. जर आम्ही उत्तम फलंदाजी केली असती तर, आमचे प्रदर्शन चांगले राहिले असते.”
आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 172 धावा केल्या. त्यामध्ये रजत पाटीदार 22 चेंडू 34 धावा, विराट कोहली 24 चेंडू 33 धावा, महिपाल लोमरोरने 17 चेंडूत 32 धावांची खेळी खेळली. कॅमरन ग्रीन 27, डु प्लेसिस 17, कार्तिकनं 11 धावांच योगदान दिलं. ग्लेन मॅक्सवेल शून्यावर (Golden Duck) बाद झाला. राजस्थानसाठी आवेश खानने 3, तर रविचंद्रन अश्विनने 2 बळी घेतले.
राजस्थानकडून धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल (45) धावा, रियान पराग (36), शिमरन हेटमायर (26), रोवमन पाॅवेल (16)* धावा यांनी मोलाचं योगदान देऊन संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. राजस्थान राॅयल्सनं क्वालिफायर 2 मध्ये त्यांच स्थानं पक्क केलं. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार रविचंद्रन अश्विनला देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
प्ले-ऑफमधील पराभवानंतर RCBच्या दिग्गजाची निवृत्तीची घोषणा, क्रिकेट वर्तुळातून….
आरसीबीचं ट्रॉफीचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं, एलिमिनेटर सामन्यात राजस्थानचा रोमहर्षक विजय
बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामन्यात फिक्सिंग झालं? दिनेश कार्तिक आऊट होता, मात्र थर्ड अंपायरनं…