---Advertisement---

आरसीबीचं ट्रॉफीचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं, एलिमिनेटर सामन्यात राजस्थानचा रोमहर्षक विजय

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. राजस्थाननं बंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या होत्या. राजस्थाननं हे लक्ष्य 19 षटकांत 6 गडी गमावून गाठलं.

राजस्थानकडून यशस्वी जयस्वालनं सर्वाधिक 45 धावा केल्या. रियान परागनं 36 धावांचं योगदान दिलं. अखेरच्या षटकांमध्ये हेटमायरनं 14 चेंडूत 26 धावा ठोकल्या. रोव्हमन पॉवेल 8 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं 2 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. रजत पाटीदारनं 34 धावा, विराट कोहलीनं 33 धावा आणि महिपाल लोमरानं 32 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेलं. याशिवाय कॅमेरून ग्रीननं 27 धावांच योगदान दिलं.

या चौघांशिवाय आरसीबी संघाच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. राजस्थान रॉयल्सकडून वेगवान गोलंदाज आवेश खाननं सर्वाधिक 3 बळी घेतले. तर फिरकीपटू आर अश्विनला 2 बळी मिळाले. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन

इम्पॅक्ट प्लेअर्स – स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशक, हिमांशू शर्मा

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेअर्स – शुभम दुबे, डोनोवन फरेरा, नांद्रे बर्गर, शिमरॉन हेटमायर, तनुष कोटियन

महत्त्वाच्या बातम्या – 

बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामन्यात फिक्सिंग झालं? दिनेश कार्तिक आऊट होता, मात्र थर्ड अंपायरनं…

रोव्हमन पॉवेलचा हा झेल पाहून मैदानावरील सर्वच थक्क! कोणाचाच विश्वास बसेना; पाहा VIDEO

जे कोणीही करू शकलं नाही ते विराटनं करून दाखवलं! राजस्थानविरुद्ध लवकर आऊट होऊनही रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---